वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे अकोल्यात स्वागत, भिम गितांचा बहरदार कार्यकम ठरला आकर्षक
ॲड प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाची लागली उपस्थितांना प्रतिक्षा
महाराष्ट्र राज्यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा जरी नागपुर येथे संपन्न होत असला तरी जे उपासक उपासिका नागपुरला जावू शकत नाही ते असंख्य उपासक हे अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाकरीता अकोला येथे अायोजित धम्म मेळाव्याला असंख्य जनसागर उलटला असल्याचे चित्र आजच्या अकोल्यात सुरु होणाऱ्या धम्म मेळाव्याच्या अनुषंगाने पहावयास मिळत आहे.
दसरा मेळाव्याकरीता मुंबईमध्ये उध्दव ठाकरे शिवसेना गट, शिंदे शिवसेना गट तर भगवान गडावर मुंडे परिवाराचा झालेला दसरा मेळावा हा नक्कीच चर्चेचा ठरला असला तरी एकमेकांवर अारोप प्रत्यारेाप करीत गाजला अाहे.
दसरा मेळाव्याची पंरपरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जरी केली असली तरी परंपरा शिवसेनेच्या माध्यमातुन सुरु आहे. तर भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे याच्या माध्यमातुन सुरु केलेली परंपरा त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात जरी सुरु असली तरी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाविकास आघाडीचा काडीमोड करीत महायुतीसोबत बसून सत्ताकारण करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाला भगदाड पाडल्यानंतर एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वात नव्याने दसरा मेळावा अायोजित करण्यात येत असतो. सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने या होत असलेल्या दसरा मेळाव्यामध्ये उध्दव ठाकरे शिवसेना गटाला गालबोट लावीत राज्यात महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता द्या असे आवाहन काल झालेल्या दसरा मेळाव्याच्या आयोजनापित्यर्थ दिले.
ही बातमी वाचा –Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा!
तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यामध्ये होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित जरी असला तरी यावेळी सत्ताधाऱ्यावर आगपाकड करण्यात कसलीच कसर सोडली नाही.
तर भगवान गडावर कधीकाळी एकमेकाविरेाधात चिखल फेक करणारे बहीण भाऊ ह एकत्र अाल्याचे पहावयास मिळाले तर एकमेकांबद्दल कौतुंकाचा वर्षाव करतांना ते आढळून आल्याचे प्रसारमाध्यातुन ऐकावयास मिळाले.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
तर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विर्दभातील अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड बाळासाहेेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये होत असलेल्या धम्म मेळाव्याकरीता उलटलेला जनसागर पाहता यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने ॲड बाळासाहेब आंबेडकर काय मार्गदर्शन करतात वा सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
