buldnana mahayuti

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या उमेदवारांना सोसावा लागणार असे बोलल्या जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

बुलढाणा जिल्हयात असलेल्या बुलढाणा नगर परिषद येथे तर भाजपा आणि शिवसेना शिंदेगट हे आमनेसामने उतरले आहेत. प्रारंभीपासून भाजपा आणि शिवसेनेचे सोयरेसुतक जुळत नसल्याने यावेळी भाजपाने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर शिवसेना शिंदे गट आ.गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांची पत्नी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरली आहे. त्यामुळे यावेळी या बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतलील आहे. तर बुलढाण्यात महाविकास आघाडी एकसंघ पध्दतीने लढत असल्याने यावेळी महाविकास आघाडीच्या विजयाचे संकेत चांगले दमदार ठरु शकतात असे संकेत आता बुलढाणाकरुन व्यक्त होत आहेत.

 

ही बातमी वाचा – विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास काँग्रेस ठरली अयशस्वी!

तर खामगांव नगर पालिकेत यावेळी वेगळाच व्टिस्ट पहावयास मिळत आहे. यावेळी भाजपाचे आमदार तथा कामगार मंत्री असलेल्या आकाश फुंडकर यांच्या वहिनी यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसची ओळख तळागळात करणारे काँग्रेसचे माजी आमदार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन नव्याने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात महायुतीतील मित्र पक्ष असतांना सुध्दा यावेळी महायुतीतील दोन्ही पक्ष आमने सामने उतरले आहेत.

 

तर यावेळी काँग्रेस ने नव्या नेतृत्वाला संधी दिली असून किशोरअप्पा भोसले यांच्या सौभाग्यवती यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. किशोरअप्पा भोसले यांची भाजपातील कर्तव्यदक्षता आणि काँग्रेसच्या माध्यमातुन तळागळापर्यंत आपलेपणाची भुमिका ही नक्कीच सर्वच समाज घटकांला सुपरिचीत असल्याने या निवडणुकीमध्ये महायुतीच्या मित्र पक्षांच्या लढतीचा फायदा हा नक्कीच काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवकांची संख्या वाढीस कारण ठरल्यास त्याला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

तर शेगांव शहरातील भाजपाचा मागील 5 वर्षाचा सत्ताकाळ हा जरी महत्वपुर्ण असला तरी प्रशासकीय कार्यकाळात जनसमान्यांशी असलेला जनसंपर्क हा लयास गेल्याचे चित्र मागील चार वर्षात निर्दशनास येत असून यावेळी काँग्रेस आणि वंचित च्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरीता उमेदवार रिंगणात उतरविले असले तरी यावेळी भाजपाने केलेली राजकीय खेळी यशस्वी होईल का असेही बोलल्या जात आहे. तरी यावेळी सत्ताकारणासाठी महायुतीतील मित्र पक्ष हे डोकेदुखी ठरल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चीत.

Scroll to Top