Railway Khamgaon

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.

वामन नगर परिसरासह इतर नागरिकंाचा आंदेालनात सहभाग

खामगांव– शहरात वर्दळीचा रस्ता असलेल्या रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम एक दोन महिने नव्हे तर तब्बल दिड वर्षापासून  प्रलंबित पडले असल्याने जनता त्रस्त झाली आहे.  त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकंाना पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे रहदारीला त्रास होत असल्याने खोदलेला रस्ता त्वरीत बुजुन टाकावा या मागणीसाठी भाजपाचे माजी न.प. उपाध्यक्ष  महेंद्र रोहणकार  यांच्या नेतृत्वात  स्थानिक नागरिकांनी शहर पोस्टे समोर आंदोलनास सुरुवात केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

भाजपाचे माजी न.प.उपाध्यक्ष यांनी 17 सप्‍टेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. की दिड वर्षापासून सदर खोदकाम करण्यात आले असून मागील सहा महिन्यापासून  या भुयारी मार्गाचे काम बंद आहे. त्यामुळे वामन नगर परिसरातील नागरिकांना मागील दीड वर्षापासून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ही बातमी वाचा –प्रसिध्दीला प्राधान्य न देता ढमाळ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

तरी भुयारी मार्गाचे काम बंद करुन रस्ता पुर्ववत करण्यात यावा. अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. तरी निवेदनानुसार दि. 19 सप्‍टेंबर पासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने मागणी पुर्ण न केल्यास भुयारी मार्गाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा शासनाला महेंद्र रोहणकार यांनी दिला आहे. तरी या आंदोलनास आजी माजी नगरसेवकांसह परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

तांत्रिक अडचणी सोडवून भुयारी मार्गाला लवकरच सुरुवात होईल- ना.फुंडकर

 

सदर काम हे मागील वर्षी  रेल्वे विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले होते ते अाता रेल्वे मंडळाकडे गेले असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यंाशी बैठक घेवून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची प्रतिक्रीया ना. आकाश फुंडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

 

Comments are closed.

Scroll to Top