Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

 भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

त्यामध्ये अवघ्या 10 दिवसाच्या  कालावधीत 8 फेऱ्या पुर्ण केल्या असून आजवर  पाच लाखाच्या आसपास रेल्वे प्रवाश्यांनी प्रवासाचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली असून या गाडीे प्रवासी तिकीटामधुन रेल्वे प्रशासनाला 68 लाखा इतके उत्पन्न मिळाले आहे.

 

तरी आता कुठलाही सण उत्सव नसतांना सुध्दा या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाश्यांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता रेल्वे विभागाला या गाडीकरीता डबे वाढवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ही बातमी वाचा –गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!

विदर्भातील बहुतांश नागरिक हे पुण्यात व्यवसाय व नोकरीकरीता वास्तव्यास असले तरी पुण्यातुन निघणारी ही वंदेभारत एक्सप्रेस खान्देश आणि विदर्भातील शहरांना जोडणारा दुवा असून अत्याधुनिक सेवेमुळे या गाडीला प्रावश्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे  रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

प्रवाश्याचा प्रतिसाद पाहता डबे वाढण्याची शक्यता

आता लवकर राज्यातील सण उत्सवाची लगबग पाहता दसरा, दिवाळी या सणाच्या अनुषंगाने रेल्वे विभागाकडून प्रवाश्यांची वाढती गर्दी पाहता व अनेकदा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे प्रवाश्यांचा हिरमोड रोखण्यासाठी  रेल्वे विभागाच्या वतीने या गाड्यांचे डबे वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments are closed.

Scroll to Top