माझा बाळाला जिवंत करा, माझी बायको मुल मागते हे पाहून जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातील आक्रोश हा मनाला छेदणारा असल्याने उत्तर प्रदेशातील लखमी खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे.
विनीत गुप्ता असे त्या पिडीत पित्याचे नाव असून आपली आपबीती संागतांना त्यांने सांगितले की, माझ्या पत्नी रुबी गुप्ता हीस चुकीचे औषध दिल्यामुळे आपल्या बाळाचा मृत्यु झाल्याचा आरोप त्याने केला आहे. माझी पत्नी बाळाबद्दल विचारणा करीत आहे. मी तिला काय उत्तर देवू असे तो वारंवार सांगत होता. त्यावर जिल्हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी त्या महिलेच्या आरोग्य तसेच वैद्यकीय खर्चाची प्रशासन घेईल असे आश्वासन दिले. आता त्या पिडीत मातेची प्रकृती स्थित अाहे. तरी पहिल्या तपासणीच त्रुटी आढल्याने त्या खाजगी रुग्णालयास सील करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी कसून तपासणी सुरु असून सिल केलेल्या रुग्णालयातील सर्वच रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ही बातमी वाचा –राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
पिडीत पित्याने सांगितले की, मी माझ्या कामानिमित्त बाहेर गावी हरिव्दारला गेलाे होतोत त्यामुळे गुरुवारी रात्री माझे मेहुणे आणि त्यांच्या पत्नीने रुबीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. आणि मध्यरात्री रुबीची तब्येत खराब झाल्याचा फोन आला. खाजगी रुग्णालयात सर्वसाधारण प्रस्तुतीसाठी 10 हजार आणि एका शस्त्रक्रीयेकरीता 12 हजार रुपयांची मागणी केली. आम्ही पैश्याची जुळवाजुळव करुन 8 हजार रुपये जमा करुन डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केली तरी त्यांनी नकार दिला असा आरोप पिडताने केला आहे.
वेळेवर उपचार न झाल्याने बाळाचा गर्भातच मृत्यु
खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास नकार दिल्याने दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची परवानगी मागितली तरी सुध्दा ते पैश्््याची मागणी करीत होते. माझ्या पत्नीची तब्येत जास्त बिघडल्यानंतर त्यांनी रुग्णालयातुन काढून बाहेर रस्त्यावर आणून सोडले. दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेल्यावर तेथील वैद्यकीय तज्ञांनी सांगितले की, या अगोदरच्या रुग्णालयात चुकीच्या औषधी दिल्याने बाळाचा गर्भाशयातच मृत्यु झाला आहे. तरी आजच्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायिककरणामुळे मानवी आरोग्य हे धोक्यात आल्याचे या घटनेवरुन जाणवते.
