Rajmata Ahilya Holkar

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन धनगर समाजाचे नेतृत्व अशोक देवकते यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय नजीक करण्यात आले यावेळी शेगांव शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी बुरुंगले, श्रीराम  पुंडे,मार्तंड बाेरसे, अशोक करे, सदानंद देवकर,मोहन काठोळे, अरविंद तायडे, स्वामी बोराडे यांच्यासह धनगर समाजासोबत इतर समाजातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यावेळी मान्यवरांच्या वतीने राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या कार्य शैलीवर प्रकाश टाकण्यात आला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा –आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

राजमाता अहिल्याराणी होळकर यांची कतृत्वशैलीचा सन्मान पाहता युती सरकारने राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या300 जयंती निमित्त दिलेला सन्मान आणि देशभरात ऐतिहासिक बाबी स्मरणात राहण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर राबविलेले राजमाता अहिल्याराणी होळकर यांचे बोध चिन्ह व त्यासाठी काढण्यात आलेले आदेश ही खरोखर सन्माननीय बाब आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचे आभार मानण्यात येत आहे.

 

राजमाता यांच्या कर्तव्यतत्परेबद्दल युती सरकारने घेतलेला पुढाकार हा नक्कीच अभिमानस्पद असल्याच्या प्रतिक्रीया आता उमटत आहेत. राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या कर्तव्य शैलीचे स्मरण अविरत राहावे याकरीता त्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रत्येक कार्यालयात या बोध चिन्हाचा वापर होण्याचे आदेश असतांना सुध्दा त्यावर बहुतांश कार्यालयात  त्याची अंमलबजावणी झाली नाही. ही शोकांतिका आता व्यक्त होत असली तरी धनगर समाजातील  राजकीय व सामाजिक नेतृत्वांनी त्या संबधित अधिकाऱ्यांना या अादेशाची प्रत दाखवून याची अमंलबजावणी व्हावी अशी मागणी होणे अपेक्षित आहे.

 

सदर आदेश हा मे महिन्यात पारीत झाला असला तरी  त्या बोधचिन्हाच्या वापराबाबत बहुतांश कार्यालयात अंमलबजावणी बाबत होत असलेल्या दिरंगाई मुळे  नाराजी उमटत आहे. तरी मंत्रालय स्तरावरुन याबाबत पुनश्च निर्देश देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Comments are closed.

Scroll to Top