बुलढाणा जिल्हयातील 443 रुग्णांनी घेतला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 3.68 कोटीचा फायदा
अमरावती- राज्यामध्ये गोरगरीब तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाव्दारे आर्थिक मदत पुरविली जात आहे. मागील सात महिन्याच्या कालावधीत तब्बल 1187 रुग्णांना 10 कोटी 61 लाख 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातुन प्रदान करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन व सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजीटल प्रणाली तसेच जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली.तेव्हापासून रुग्णांना मंत्रालयात येण्याची सुध्दा आवश्यकता राहिलेली नाही. प्रारंभी रुग्णांनी महात्मा ज्योतीबा फुले, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
ही बातमी वाचा –वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त
जर या योजनांव्दारे उपचार शक्य नसल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतुन अर्ज करता येतो.त्यामुळे योग्य रुग्णाला त्याचा सुयोग्य वापर करणे सोयीचे होईल अशी माहिती मिळाली आहे. तरी संबधित रुग्णांना अर्ज प्राप्ती नंतर व इतर योजनेच्या लाभात आजार बसत नसल्यास तत्पर सेवा पुरविण्यात येते.
याकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे
* रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड
* रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)
* वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
* एफआयआर (अपघातग्रस्तासाठी)
* ZTCC पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)
सर्व कागदपत्रे पिडीएफ स्वरुपात ईमेल aao.cmrf-mh@gov.in पाठवा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 9321103103 वर संपर्क साधावा.
या आजारासाठी मिळते मदत
* कॅक्लिया इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6)
* ह्दय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण
* कर्करोग (शस्त्रक्रीया, केमोेथेेरपी, रेडिएशन)
* रस्ते अपघात
* बालकांच्या शस्त्रक्रीया
* हिप व गुडघा रिप्लेसमेंट
* मेदुंचे आजार, डायलिसिस अस्थिबंधन
*बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण
* नवजात शिशुंचे आजार इत्यादी 20 प्रकारच्या गंभीर आजारांसाठी मदत प्रदान केली जाते.

Comments are closed.