Nagar Parishad

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

शेगांव– शहराचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाची गावपातळीवर असलेली पकड हा महत्वपुर्ण मुद्दा ठरणार अाहे. मागील  अडीच वर्षापासून शेगांव शहरातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी हे सत्तेपासून दूर आहेत. कारण सत्ताकाळ संपल्यापासून या नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. आणि त्या कारणामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींची ओळख सुध्दा आता लयास गेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

 

त्यामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेले व अभ्यासू राजकारणी व स्थानिक नेतृत्वांना प्राधान्य राहणार आहे. शेगांव शहरात सद्या सत्ता असाे वा नसेा परंतु सर्व समाज घटकांशी आपली बांधिलकी जोपासण्याचे काम ज्या नेतृत्वांच्या माध्यमातुन झाले आहे. त्यांची खरी कसोटी अनुभवता येणार आहे. शेगांवच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर काँग्रेस अगोदरच्या काळात या ठिकाणी प्रभावी राहीली असली तरी मागील 10 वर्षाच्या काळात भाजपा व मित्र पक्षांचा वरचष्मा कायम राहीला आहे. त्या मागचे कारण सुध्दा तितकेच महत्वपुर्ण असण्यामागे शेगांव शहरातील कतृत्वान नेतृत्व या पक्षात उदयास आले आणि त्यांच्या स्थानिक पातळीवर असलेला विश्वास व जनतेप्रती असलेली कर्तव्य तत्परता नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनुभवयास येवू लागली आहे.

 

 

ही बातमी वाचा – काँग्रेस शेगांव शहर ने दिली नव्या चेहऱ्यांना संधी

 

राज्यात आणि केंद्रात सद्या महायुतीचे सरकार असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीसोबत राहुन होणारी निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने सद्या शेगांव शहरातील इच्छुकांची फळी वाढत आहे. परंतु वाढत्या फळीमध्ये संधी मिळणार कोणाला याकडे सगळ्यांना उत्सुकता लागली असली तरी या ठिकाणी राजकीय पक्षापेक्षाही त्या पक्षातील असलेले स्थानिक नेतृत्व हे नक्कीच महत्वपुर्ण भुमिका घेणार आहेत. यात कुठलेच दुमत नसले तरी आता आलेल्या नव्या युवा पिढीच्या राजकारण्यांना या निवडणुकीत मोठा रस असला तरी जनसमान्यांच्या समस्या आणि असलेली जबाबदारी पेेलवण्याचे सामर्थ्य नसतांनाही अनेकजण वेगवेगळे गटामध्ये जाणून आपले अस्तित्व सिध्द करण्याच्या तयारीत असल्याने सद्या सत्ताधारी आणि मित्र पक्षांच्या बाबतीत  ही मोठी बाब समोर आली आहे.

 

 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाराष्ट्रातील भुकंंपानंतर व घरफोडीनंतर राज्यातील वातावरण छन्नविछीन्न झाल्याचे वास्तव्य अनुभवयास आले असले तरी  स्थानिक पातळीवर पदाधिकारी संख्या वाढीस लागली असली  तरी विविध गटात विभागलेल्या पक्षामध्ये आता कार्यकर्त्यांचा अभाव पहावयास मिळून येत आहे. एकनिष्ठतेचे बाळकडू असणाऱ्यांनी जुन्या गटाला प्राधान्य दिले असले तरी अनेक पक्षांच्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकारण्या या फक्त कागदावरच असल्याचे वास्तव्य अनुभवयास आले आहे. ही गत नव्या गटाची सुध्दा शहर आणि तालुक्याकरीता सारखीच आहे. तर स्थानिक पातळीवर भाजपा पक्षातही गटाचे वारे वाहण्यास आता प्रारंभ झाला असल्याचे चित्र शहरातील विविध कार्यक्रमातुन पहावयास मिळते. तरी आता शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा केली असून राज्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती व नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणुकीबाबत नियोजन करण्याचे काम निवडणुक आयोगाच्या माध्यमातुन होत असले तरी  शेगांव शहरातील राजकीय पक्षांनी नव्याने शहराध्यक्ष पदाची सुत्रे अनेकांकडे सोपावली असली तरी शेगांव शहर भाजपा शहराध्यक्ष पदाचा पदभार अद्यापही गुलदस्त्यात असल्याने यावेळी  पक्ष श्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्व यांच्या माध्यमातुन अद्यापही निवडीचे वातावरण समोरे आले नाही.

 

 

 

काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष पदाची सुत्रे जरी देण्यात आली असली तरी पदाचा पदभार घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरची सक्रीयता वाढविण्याच्या अनुषंगाने असलेल्या हालचाली अद्यापही अपेक्षानुसार नसल्याची चर्चा सुज्ञ राजकाण्यामध्ये रंगली आहे. त्यामुळे शेगांव शहरातील राजकारणात काँग्रेस मधील पक्ष श्रेष्ठी आणि एकनिष्ठता जोपासणाऱ्या मतदारांची गोळा बेरीज ही यावेळेसही भाजपा व महायुतीतील मित्र पक्षांना धक्कादायक ठरणारी आहे. तर राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने मागील 20 वर्षापासुन या मतदार संघावर वर्चस्व असलेले आ.डॉ. संजय कुटे यांनी मागील कार्यकाळात भाजपाची सत्ता  नगर परिषदेवर कायम ठेवत शेगांव वर्चस्व प्रस्थापित केले होते.

 

 

परंतु आज रोजी ती वास्तविकता कायम ठेवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाचा पुढाकार हा महत्वपुर्ण राहणार आहे. शेगांव शहर आणि नव्या जुन्या प्रभागाचा विचार करता स्थानिक परिसरात इच्छुकांची संख्या बळावली असली तरी पक्षासोबतच भुमिका आणि राजकीय पक्षाला आजवर झालेली मदत आणि सर्वसामान्यात असलेल्या स्वच्छ प्रतिमेला मान देण्याची भुमिका ही राहणार असली तरी स्थानिक जुने जाणते व अभ्यासू नेतृत्वंाना समावून घेतले जाणार की, नव्या चेहऱ्यांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

तर काँग्रेस पक्षाच्या बाबतीत येथील वास्तविकता ही सुध्दा जुन्या जाणत्या व अभ्यासु नेतृत्वावर अवलंबुन राहणारी  अाहे. तरी यावेळेस काँग्रेस च्या स्थानिक वरिष्ठांची काय भुमिका राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेआहे.

Comments are closed.

Scroll to Top