Shegaon Congress camitee

काँग्रेस शेगांव शहर ने दिली नव्या चेहऱ्यांना संधी

युवक काँग्रेस शहराध्यक्ष पदी- लखन पिवाल
अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष पदी – हैदर अली

काँग्रेस शेगांव शहरचे शहराध्यक्ष पदाची सुत्रे कैलास देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर आता विविध कार्यकारणी घोषित करीत त्यांची नियुक्तीची कामे जोमात असल्याचे वातावरण शेगांव काँग्रेस च्या वतीने सुरु आहे. तर शेगांव युवक काँग्रेस शहराध्यक्ष पदी लखन पिवाल तर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी हैदर अली यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने स्थानिक पातळीवर विविध समिती व कार्यकारणी गठीत करण्याच्या दृष्टीने काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख यंाची भुमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
नव्या शहराध्यक्ष कैलास देशमुख यांना शहरवासियांकडून तसेच काँग्रेस चाहत्यांच्या वतीने अनेक अपेक्षा असतांना त्यांच्या कार्यकाळात होणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याकरीता त्यांची असलेली भुमिका ही नक्कीच महत्वाची राहणार आहे.

ही बातमी वाचा   मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा!

काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा पदभार हा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता तसेच शेगांव शहरातील काँग्रेसचे संघटन करण्याच्या दृष्टीने कैलास देशमुख यांची नेमकी कोणती रणनिती राहणार आहे. याकडे सर्व शेगांववासियंाचे लक्ष लागून आहे. तरी येणाऱ्या काळात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ती कोणती रणनिती आखतात तो येणारा काळ दाखवून देईल.

 

तरी नव्याने युवकांची घोषणा केल्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरी नव्या नेतृत्वांना संधी देण्याचे काम करण्यात आले असले तरी येणाऱ्या काळात आपले नेतृत्व त्यांनी सिध्द करावे अशा शुभेच्छा शहराध्यक्ष कैलास देशमुख यांनी दिल्या आहेत.

Comments are closed.

Scroll to Top