युवकांनी सावधानता बाळगा-माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील
शेगांव शहरातील युवकांना ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातुन आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली युवकांकडून ऑनलाईन व्यवहारासाठी खाते खोलण्याचे प्रकार सर्रास सुरु झाले असून त्या युवकांच्या खात्याला फसवणुक कर्त्याचा नंबर लावून त्या खात्यावर लाखो रुपयाचे व्यवहार करण्यात येवून युवकांची फसवणूक करण्याचा प्रकार समाेर आल्याने त्या पिडीतांना काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील तसेच काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख यांच्याकडे धाव घेतली.
याप्रकरणी शेगांव शहर काँग्रेसच्या वतीने संबधित बँकाना भेटी देण्याचे काम मोठ्या जाेमाने सुरु असून पिडीतांची खाते होल्ड करण्याची विनंती केली आहे. तसेच सर्वांना आवाहन सुध्दा केले आहे की,शेगांव शहरासह राज्यात सुध्दा अश्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
चोरीचा सुळसुळाट
शेगांव शहरातील अनेक युवकांची फसवणुक करुन त्यांच्या खात्यावरुन लाखो रुपयाचे व्यवहार केल्यामुळे युवकांचे भविष्य संपुर्ण जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या खात्यावर झालेले व्यवहार तपासणी करीत बँकेकडून त्या युवकांना विचारपूस करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. तरी ऑनलाईन फसवणूकीचा हा नवा प्रकार युवकांचे भवितव्य संपुष्टात आणणारा आहे.
तरी आजच्या युवा पिढींनी आपला मोबाईल नंबर, खाते क्रमांक, आधार कार्डचा वापर करण्याकरीता इतरांना देतांना मोठी तसदी घेण्याची गरज आहे. अन्यथा अापले भविष्य अडचणीत येवू शकते याप्रकरणी आता झालेल्या फसवणुक कर्त्यांच्या वतीने शेगांव शहरातील सर्व बँक व व्यवस्थापकांना भेटी घेवून सबंधित पिडीतांचे खाते होल्ड करण्याचे काम सुुरु आहे. तरी सर्व शेगांव शहरातील युवकांनी, महिलांनी व नागरिकांनी असा ऑनलाईन पैश्याचा अमिषाला बळी पडू नये आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.
शहरातील पिडीतांची संख्या बळावली
शेगांव शहरातील युवकांना मोबाईचे आकर्षण असल्यामुळे माेबाईल गेमिंग मध्ये बहुतांश मुले अडकली अाहेत. त्याचा गैरफायदा फसवणुक कर्त्याकडून मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे आजच्या घटनेतुन समोर आले आहे. तरी या प्रकरणाबाबत जागरुकता आणण्याकरीता पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी. तसेच युवकांनी सुध्दा अमिषाला बळी पडू नये असे अवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.