शिवसेना आमदाराचा दावा, मंत्री सरनाईकांनी फेटाळला
सद्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार हे स्थापित झाले आहे. या सरकारने सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली असली तरी त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा होणारे 1500 रुपये अनुदान वाटपामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा भार पडल्याची चर्चा आहे.
महायुतीला निवडणुकापुर्व पुन्हा सत्तेत येण्यासाठी नव्याने विविध योजने अंतर्गत राज्यात लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली असली तरी त्याचा फायदा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला झाला असून महायुतीच्या आमदारांना बहुमत मिळाल्याने ते पुन्हा सत्तेत स्थानापन्न झाले असले तरी आता या योजनेकरीता कोट्यावधीची तरतुद ही डोकेदुखीची ठरत असल्याने राज्यातील इतर विकासाचा पैसा सुध्दा योजनेकरीता वापरला जात असल्याची ओरडच सत्ताधारी आमदारांकडून होत असल्याची कुजबुज चर्चेत येत आहे. तरी या बाबत राज्याचे मुख्यमंत्री व इतर मंत्र्याकडून सावरा सावर करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
राज्यात सुरुवातीला लाडकी बहीण योजना सुरु करतांना अर्ज दाखल करताच प्रत्येक महिला लाभार्थ्यांना निधी देण्याची कुठलीच कसर राज्यकर्त्यांनी केली नाही. आणि सर्वोतोपरी सर्वच महिलांच्या बचत खात्यात रक्कम जमा करण्याचा कार्यक्रम केला असला तरी आता राज्याच्या तिजोरीत पडणारा भार पाहता विविध निकषाच्या माध्यमातुन अनेक महिला लाभार्थ्यांना यातुन कमी करण्याचा कार्यक्रम सत्तेत आल्यानंतर मोठ्या शिताफीने या सरकारच्या माध्यमातुन होत असल्याची ओरड आता ज्या महिलांना वगळण्यात आले आहे त्यांच्याकडून होत आहे. तरी सद्याचे कार्यरत मुख्यमंत्री जरी लाडकी बहीण योजनेला निधी कमी पडु देणार नसल्याचा दावा करीत असले तरी आमदारांच्या असलेल्या विकासाकरीताचा निधी हा मागील 10 महिन्यापासून मिळाला नसल्याची ओरड शिवसेनेच्या आमदाराच्या वतीने होत आहे.
्महाराष्ट्रात महायुतीची लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी असली तरी ती चालविण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारवर कोणत्या ना कोणत्या विभागाचे पैसे वळवून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगु लागल्या आहेत. तर आमदारांना निधी मिळण्याकरीता अडचणी निर्माण होत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दावा केला आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत सापडले आहे त्यामुळे मागील 10 महिन्यापासून एकाही आमदाराला निधी मिळाला नाही पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या काळात राज्याची परिस्थीती सुधारण्याचा विश्वास व्यक्त करीत आहे. असे मत संजय गायकवाड यांनी मांडले असले तरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदाराचा दावा फेटाळून लावला आहे .
