नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 ला सुरुवात करण्यात आली असली तरी या ट्रेन च्या सुरु होण्याअगोदरपासून अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सेवा आणि रेल्वेेे च्या वतीने आकारण्यात आलेले तिकीट दर हे वाढीव असून विमानाच्या दराइतपत हे महाग असल्याचे प्रवाशी संघटनेकडून ताशेरे ओढण्यात आले असून खाजगी प्रवासी सेवेला फायदा देण्याच्या दृष्टीने वेळापत्रक असल्याची ओरड होत आहे.
केद्रींय रेल्वे विभागाच्या वतीने प्रवाश्यांना प्रवासाची दर्जेदार सेवा देण्याचे दृष्टीने भारतात नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असल्या तरी प्रवासाकरीता असणारे तिकीट दर हे विमानाच्या तिकीट दराच्या तुलनेत असल्याचे मिळालेल्या तिकीटाच्या दरपत्रकावरुन जाणवते. त्यामुळे रेल्वे विभागाच्या माध्यमातुन सुुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाश्यांची नापसंती मिळण्याची शक्यता आता प्रवासी संघटनेकडून वर्तविली जात आहे.
रेल्वे प्रवास आणि अारक्षणाच्या सुविधाबाबत रेल्वे प्रशासनाच्या वतीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असले तरी नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस आणि या अगोदर सुरु असलेल्या अनेक रेल्वेच्या प्रवाशी गाड्यांच्या तुलनेत असलेले तिकीटदर आणि असलेली सुविधा याबाबत बरीच मोठी तफावत असून सुविधा देण्याच्या नावाखाली प्रवाश्यांची लुट होत असल्याची तक्रार आता प्रवाशी संघटनेच्या माध्यमातुन होत आहे.
सत्ताधारी वंदे भारत सुरु करण्याबाबत श्रेय घेत जरी असले तरी याचा फायदा घेणारा वर्ग हा मर्यादित असला तरी वंदेभारत च्या स्वागताकरीता राज्यकर्त्यांकडून मोठी गर्दी पहावयास मिळत असली तरी ही गर्दी बेगानी शादी मे अब्दुला दिवाना अशी वास्तविकता आता चर्चेत येवू लागली आहे.
वंदेभारत एक्सप्रेस सुरु होणार असल्याच्या चर्चा अनेक प्रसारमाध्यमातुन होत असल्या तरी प्रत्यक्षात सुरु होण्याअगोदर त्याचे श्रेय घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याची वास्तविकता ही प्रसारमाध्यमातुन होत असली तरी प्रवासी संघटनेच्या वतीने वंदेभारत मधील सुविधा आणि त्याकरीता अाकारण्यात येणारे तिकीटदर हे खाजगी सेवेपेक्षा महागडे असल्याचे आता चर्चेत येवू लागले आहे.
तरी नागपुर– पुणे ही वंदेभारत सद्या महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्लयाची गाडी असून या गाडीकरीता असलेला चेअर कार आणि एक्सक्लुझिज सुविधाच्या नावाखाली असलेल्या सुविधा वा विमानाच्या तुलनेत असल्या तरी वेळापत्रक आणि लांब पल्ल्याच्या गाड्याकरीता स्लिपर कोच चा अभाव हा नक्कीच प्रवाश्यांना डोकेदुखीचा ठरणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रवाशी वंदे भारत च्या प्रवासाला कितपत पसंती देणार हा येणारा काळच सांगु शकतो.
