दि २९ लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा वारंवार अवमान करणाऱ्या बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आता पत्रकार आक्रमक झाले आहेत. बुलढाण्याचे पत्रकार वसीम शेख यांच्याशी केलेल्या असभ्य वर्तनाचा निषेध करत, गायकवाड यांना मानसिक शांतीसाठी ‘मेडिटेशन सेंटर’मध्ये पाठवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मंगळवारी बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाण्यात आंदोलन पार पडले. त्यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकी प्रकरणी हे आंदोलन होते. दरम्यान गायकवाड यांनी पत्रकार परिषद आयोकीत करून आपली बाजू मांडीत असतांना पत्रकार वसीम शेख यांनी वक्तव्यासंदर्भातआमदार संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर संयमी उत्तर देण्याऐवजी आमदारांची जीभ घसरली. त्यांनी संबंधित पत्रकाराला “तू कच्च्या डोळ्यांचा आणि कच्च्या कानाचा आहेस” अशा हीन शब्दांत हिणवून संपूर्ण पत्रकारितेचा अपमान केला. या प्रकारामुळे जिल्हाभरातील माध्यम प्रतिनिधींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासाठी बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोशिएशनने आज जिल्हाभरात निषेध आणि निवेदन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शेगावात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हे पण वाचा…आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, आ. संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी असूनही सातत्याने एकेरी भाषा, शिवीगाळ आणि आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आता पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखणे आणि त्यांना अपमानित करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे कृत्य असून त्याचा निषेद सुद्धा व्यक्त करण्यात आला.आमदारांच्या स्वभावात सतत क्रोध आणि चिडचिड दिसून येत असल्याने, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि स्वभावदोषात सुधारणा करण्यासाठी त्यांना शासनाने तातडीने एखाद्या चांगल्या ध्यान केंद्रात पाठवावे, अशी उपरोधिक व रास्त मागणी पत्रकारांनी केली आहे. “ज्या पत्रकारांनी आमदार महोदयांना प्रसिद्धी मिळवून दिली, त्याच पत्रकारांना ते आज तुच्छ लेखत आहेत.
त्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा सुद्धा असोसिएशनने दिला आहे. निवेदन देता वेळी बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख, राजवर्धन शेगावकर, पत्रकार नानाराव पाटील, दिनेश महाजन, राजकुमार व्यास, समीर शेख, विठ्ठल अवताडे, मो. शारिक, ललित देवपुजारी आदी पत्रकांची उपस्थिती होती.
