जिवनाच्या वाटेवर जगत असतांना मानवी देह हा आपल्या कतृत्वशैलीतुन ओळखला जातो. अंर्तमन आणि बाह्य जगाचा संबध आपल्या कतृत्वशैलीतुन प्रस्थापित करणे ही जिवनाची कला आणि या जिवनाच्या कलेत सर्वसामान्य घटकांपासून ते प्रशासन आणि वरिष्ठांशी बांधिलकी जोपासण्याच्या काम आपल्या कर्तव्यशैलीतुन दाखविणारे संजुभाऊ आणि संजुभाऊचा सहवास हा नक्कीच सर्वोतोपरी आपलेपणाच जाणवतो. काल दि. 31 डिसेंबर 2025 रोजी महसुल विभागातुन संजय तुळशीराम ढमाळ यांचा सेवानिवृत्तीचा निरोप संभारंभ झाला आणि कळलं की आज संजुभाऊ साठी पार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवनशैलीत आणि माझ्या पाहण्यातील संजुभाऊचा कतृत्व, सर्वसामान्य शेतकऱ्यापासून ते लहान मुलांसोबत, भावंडासोबत आणि आप्तेष्टात नेहमीच चेहऱ्याच हास्य कायम ठेवत केली वाटचाल ही नक्कीच संघर्षात्मक असली तरी त्याची ओळख ही त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच कुणाला दिसून आली नाही.
ढमाळ परिवारात जेष्ठ असलेले संजुभाऊ हे बिकट परिस्थीतीतही आपल्या चेहऱ्यावर हास्य जपत दुखःची कुणालाही कधीच जाणीव न होवू देता आपलेपणा देण्यासोबत सहकार्याची भावना जोपासणारे संजुभाऊ यांच्या जिवनशैलीत त्यांचे शालेय शिक्षणाबाबत मला इतपत माहिती नसली तरी शेगांवात आल्यानंतर संजुभाऊ ढमाळ यांचा लाभलेला सहवास आणि आपल्या कतृत्वशैलीतुन सर्वसामान्य घटकासोबत शासकीय सेवेतही पारदर्शकता जोपासण्यात धन्यता मानण्यामध्ये खरी समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावरच झळकत असते. शेगांव तालुका असो व संग्रामपुर तालुका असेा संजुभाऊ महसुल विभागाच्या तलाठी पदावर असतांना ढमाळ पांडे बॉ ही ग्रामीण जनतेच्या ओठावरील आपलेपणाची बतावणी अनेकदा ग्रामीण भागात दिसून आली ग्रामीण भागात कुणालाही विचारल की, मी फैलात राहतो तर तो नक्कीच सांगायचा की, ढमाळ पांडे बॉ च्या घराजवळ राहता का? प्रशासकीय सेवेत असतांना पदाचा कधीही मोठापणा न मिरवता सर्वसामान्यांना आपलेसं करण्याच कसब संजुभाऊंच्या वागुणकीचं खरं वैशिष्टय अजातगायत पहावयास मिळते.
हे पण वाचा…आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे
कुणाचं काहीही असेा जिवनात स्वतःकरीता निर्माण केलेली तत्व आणि त्या तत्वाशी कधीच तडजोड न करता जिवनाची कार्यपध्दती आणि त्यांच्या कतृत्वशैलीचे अनुकरण हे नक्कीच इतरांना प्रेरणादायी असल्याचा अनुभव मी सुध्दा घेतला आहे.
आर्थिक उन्नती आणि पारिवारीक जबाबदारी यांचा संगम साधण्याकरीता संजुभाऊंची धडपड ही खरोखर आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी असली तरी कधीही प्रसिध्दी आणि मोठेपणाच्या भुमिकेत कधीच संजुभाऊ पहावयास मिळाले नाही. अडचणी आणि त्यावर समीकरण शोधणे संजुभाऊंनी कधीच सोडलं नसल तरी ते अडचणीत आहेत हे त्यांनी कधी कुणाला दर्शवलं नाही.
घरातील कर्ता असल्यानंतर आपल्या वडीलांच्या पश्चात घराची सर्वस्वी जबाबदारी संभाळीत नोकरी करीत असतांना घरची शेती आणि लहान भावंडाचा सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने त्याच्यावर आपल्या मुलाबांळाप्रमाणे लावलेला लळा, आणि शिक्षण आणि प्रशासन याचा कसा संवाद साधावा आणि त्याकरीता शालेय जिवनात, महाविद्यालयात जिवनात वागत असतांना जनसमान्य आणि पारिवारिकता जोपासतांना प्रत्येकाला शिक्षणाचा प्रवाहात ठेवण्याचं काम त्यांनी केलं. नोकरीच्या सेवेत असतांना पारिवारीक जबाबदाऱ्या संभाळतांना वयोवृध्द आई वडीलांच्या मनोधारणा पुर्ण करण्यासाठी कधीच माघार घेतली नाही.
भावडं लहान असतांना सुध्दा त्यांच्यासोबत मैत्रीपुर्ण नातं हे नक्कीच बरच काही सांगुन जातं. संजुभाऊ सारख्या मोठ्या देखरेखीत आपण लहानाचे मोठे झालो हा अभिमान त्या भावंडांच्या चेहऱ्यावर नेहमीच झळकत असतो. आणि कुठे राहतो यापेक्षा आपण काय करतो यावर त्यांचं नियंत्रण हे त्यांनी तर आंगिकारलं आणि त्यांच्या बोध त्यांच्या भावंडाशी संवाद साधतांनाही तो त्यांच्या चेह नोकरी सोबत शेती संभाळण्याचा चांगला अभ्यासक पाहता ते शेतकरी असल्याचे जाणवते.
अर्थ नियोजन आणि जिवनाची उन्नती याच भान त्यांनी जोपासलं आहे. आजवर ते इतरांना सांगतांना कधी स्पष्ट झालं नसलं तरी त्यांच्या या नियोजनाचा आदर्श पारिवारीक सदस्यासोबत त्यांच्या सहवासातील मित्र परिवारांना त्याचा साक्षात्कार झाल्याचं नाकारता येत नाही. आणि संजुभाऊ यांनी संविधानाला अनुसरुन या लोकशाहीच्या देशात भारताचा नागरिक आणि नागरी मुलतत्वाची धोरणे संभाळण्यासाेबत प्रशासकीय सेवेच्या काळातही काम हे निष्ठापुर्ण जोपासल्याचे समाधान काल त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात झळकत होते. आयुष्याच्या वाटेवर अडी अडचणी आणि विकासात्मक वाटचाल करणारे संजुभाऊ ढमाळ हे त्यांच्या जिवनशैलीचं जणु विद्यापीठ असल्याचं जाणवलं..
माझ्या सारख्या नवतरुणाने व्यवसायाकरीता त्यांच्याजवळ प्रकट केलेली इच्छा, आणि कुठलाही हिशोब न करता माझ्या व्यवसायिकतेला त्यांच्या माध्यमातुन दिलेली कलाटणी आज शेगांव शहरात जनसमूह वृत्तपत्राच्या कार्यालयास दिलेली जागा हा सुध्दा त्यांच्या जिवनातील पैलुतुन माझ्या सारख्या व्यवसायिकाला दिलेली संधी आणि ती सुध्दा कुठलाही करार न करता असलेला ठाम विश्वासु हे नक्कीच माणसं पारखणारं व्यक्तीमत्व आहे. तरी संजुभाऊ आपणास दिर्घायुष्यासाठी आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा…
समस्त पिंगळे परिवार,शेगांव
