समृध्दी महामार्गावर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; जिवीतहाणी टळली

शेगांव- बुलढाणा लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

केंद्रीय मंत्री यांना नागपुर येथे सोडून परतत असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली सदर गाडीचा ट्रकला आदळून हा अपघात झाला असल्याने या गाडीचे नुकसान झाले असले तरी जिवीत हाणी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

ही बातमी वाचा – ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर!

 

प्राप्त माहितीनुसार सुरक्षारक निलेश वाकुडकर, वाहनचालक भुषण चोपडे आणि त्यांचे सहकारी वैभव देशमुख हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत. नागपुर वरुन मेहकर कडे समृध्दी मार्गाने परतत असतांना हा ट्रक ला धडकून हा अपघात वाशिम जवळील रिधोरा फाट्याजवळ झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरु आहे.

Scroll to Top