शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शिवसेनेने घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेचा परिणाम अखेर जनतेला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून दिलेल्या वेळेत आजपासून शेगाव–चिंचोली, टाकळी (मार्गे )ही महत्त्वाची बस सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे.

 

बस सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिक यांना या बस सेवेचा मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली ही सेवा सुरू व्हावी, यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख   रामा पाटील थारकर यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. अखेर प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला.

 

ही बातमी वाचा – स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा!

 

या ऐतिहासिक क्षणी पहिल्यांदा गावात दाखल झालेल्या बसचे चालक व वाहक यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस पाटील  प्रदीप ढगे, माजी सरपंच शिवा पाटील गिते, रघुनाथ पाटील, देविदास लांजुळकर, रामदास हंतोडे, तुकाराम ढगे, शिवचरण गाडगे, प्रवीण वानरे, शिवसेना विभागप्रमुख महेश पहुरकार, तुकाराम गायगोळ, गोपाल ढगे, रामदास ढगे, मंगेश कोकाटे, अभी ढगे, रवी उबाळे आदी मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बस सेवा नियमित सुरू झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून, शिवसेनेच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांकडून तालुकाप्रमुख  रामा पाटील थारकर यांचे जाहीर आभार मानण्यात आले. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी शिवसेना ही केवळ बोलघेवडी नसून कृतीतून प्रश्न सोडवणारी संघटना आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Scroll to Top