राज्यभरामध्ये बहुप्रतिक्षिीत आणि बहुचर्चित निवडणुकीचा बिगुल हा तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वाजला असला तरी या निवडणुकीचे मतदान सुध्दा आटोपले आहे. मात्र निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याने प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. आता गुलाल उधळला जाणार असला तरी या निकालाची उत्सुकता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारासोबत शेगांवकरांना सुध्दा लागली अाहे. लोकशाहीचा हा उत्सव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मतदार राजाच्या मतांनी झालेली ही निवडणुक नवे शिलेदार नियुक्त करण्याकरीता असली तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने तब्बल 150 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तरी त्यातुन नगराध्यक्ष पदाचा एक आणि प्रभागनिहाय 30 नगरसेवक हे नवे शिलेदार होणार असले तरी या निकालाची उत्सुकता ही शिगेला पोहचली असली असल्याचे वास्तव्य आज सर्वोतोपरी दिसून येत आहे.
प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 15 या प्रभागात विकासाच्या नावावर राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवरांनी सुध्दा आपली उमेदवारी दाखल करीत या लोकशाही उत्सवाचा अानंद घेतल्याचे चित्र अनुभवले असले तरी या ही निवडणुकीची चुरस आता चर्चेची ठरली आहे.
प्रभागाप्रभागात सत्ता परिवर्तन आणि गड कायम राहणार या चर्चांचा उत आला आहे. तर नगराध्यक्ष पदाबाबत अनेक चर्चा रंगल्या असल्याने यावेळी निकालाची प्रतिक्षा ही सुध्दा शिगेला पोहचली आहे.
प्रभाग क्र.4 च्या प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजला असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी नव्या निवडणुकीच्या आयोगाच्या निकषानुसार कामाला सुरुवात केली असल्याचे चित्र आता प्रभाग क्र. 4 च्या निवडणुक प्रचारात दिसून येत आहे. यावेळी सत्ताधारी उमेदवाराच्या विरोधात युवकांची भुमिका ही नक्कीच दमदार असल्याच्या प्रतिक्रीया आता प्रभागवासियांकडून चर्चेची ठरु लागली आहे. तरी यावेळी या प्रभागात प्रचाराकरीता पक्ष नेतृत्व आणि जाणकारांची रणनिती आणि समाजहितासाठी नागरिक कुणाच्या परड्यात कौल देतात हे सुध्दा दि. 20 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेत दिसून येईल आणि दि. 21 डिसेंबरला इतर प्रभागासोबत या प्रभागाचा सुध्दा निकाल लागणार आहे.
प्रभाग क्र. 14 च्या निवडणुकीत नव्या युवकांची दमदार उमेदवारी
प्रभाग क्र. 14 हा शेगांव शहरातील नगर परिषदेच्या दृष्टीने या अगोदरही सौ. छाया पल्हाडे यांच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय हा नक्कीच शेगांवकरांसाठी धक्का देणारा होता. तरी यावेळी या प्रभागात शिवसेनेच्या शिलेदारांनी पुन्हा पाय रोवण्याकरीता कंबर कसल्याचे चित्र पहावयास मिळत असतांना यावेळी नवतरुण लखन देशमुख यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीने नवचैतन्य निर्माण केल्याचे वास्तव्य या प्रभागवासियांकडून चर्चेत आले आहे.
ही बातमी वाचा – प्रभाग क्र.4 च्या प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!
प्रभाग क्र. 14 शिवेसना विरुध्द शिवसेना अशी लढत असतांनाही राष्ट्रवादीच्या घडळ्याचा गजर कायम ठेवण्याकरीता अत्याधुनिक प्रचार यंत्रणा, संपर्क रॅली आणि मतदान प्रक्रीयेसाठी असलेली तत्परता या करीता सर्वोतोपरी घेतलेला पुढाकार हा सुध्दा नाविण्यपुर्ण झाल्याच्या चर्चा आता रंगत आहे. या प्रभागात मतदानाची टक्केवारी ही वाढीव असून आतापर्यंत या प्रभागात इतक्या वाढीव टक्केवारीत मतदान झाले नसल्याचे दिसून येत आहे.
दि. 21 ला गुलाल आपलाच.. या भुमिकेत उमेदवार
2 डिसेंबर 2025 राेजी झालेल्या मतदान प्रक्रीयेचा निकाल हा 3 डिसंेबर 2025 रोजी लागणार हे जरी निश्चीत असले तरी ऐन मतदान प्रक्रीयेच्या दिवशी दि. 21 डिसेंबर 2025 ला निकाल लागण्याची घोषणा केल्यामुळे यावेळी केलेल्या कामगिरीतुन गुलाल आपलाच असल्याचा भावेनत वास्तव्यात आहेत हे विशेष तरी कौल हा प्रभागातुन फक्त दोन उमेदवार आणि शहरातुन नगराध्यक्ष पदाचा एकच उमेदवार हा विजयाचा गुलाल उधाळणार आहे.
उमेदवारांची उमेद कायम, सर्वोतोपरी केले नेतृत्व
निवडणुकीच्या या लोकशाही उत्सवात जय पराजय जरी असला तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने बरेच काही शिकायला सुध्दा मिळाले जनतेच्या दरबारात आपलं नेतृत्व काय आहे हे दाखविण्याची संधी या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक नव नेतृत्वाना अनुभवता आली तरी यावेळी जुन्या चेहऱ्यांपेक्षा नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने वातावरण ढवळून निघणार असा आशावाद जनतेचा अाहे. विकासाच्या नावावर वा नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे सुध्दा या निवडणुकीचे वैशिष्टय राहील, निवडणुकीच्या रणधुमाळी सर्व पक्षीय व अपक्ष उमेदवारांनी आपल्या नेतृत्वाकरीता केलेली कसरत ही नक्कीच त्यांच्या भावी वाटचालीस मार्गदर्शक ठरणारी असेल. निवडणुकीच्या या धर्तीवर असलेला अनुभव हा शासकीय, जनसामान्य आणि पदाधिकारी संभाळण्याचे कौशल्य हे तर नक्कीच लाभले अाहे. नव उमेदवारांना इतराप्रती असलेली नम्रता, आदर जनसामान्यांचा सन्मान हा सुध्दा यावेळी या निवडणुकीच्या अनुषंगाने नवतरुणंाना शिकावयास मिळाला यात कसलेच दुमत नाही. तरी निवडणुकीच्या उत्साहात उमेदवारांची भुमिका ही सर्वांना संभाळुन घेत आर्थिक खर्च करुन नम्रतेची भुमिका ही खरोखर वाखणण्याजोगी असल्याचे दिसून आले.
