नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त 40 वृक्षांचे रोपण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेगाव : समाजसेवक प्रदीप पाटील अवचार यांनी आपल्या चिरंजीव नैतिक अवचारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवित सुखसागर नगर परिसरात तब्बल 40 वृक्षांचे रोपण केले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या भावनेतून प्रेरणा घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी आदर्श ठरला आहे.

 

याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योगपीठचे निळकंठ साबळे होते. प्रमुख उपस्थितीत ठाणेदार मनिष मेहेत्रे, वृक्षमित्र कमलेश गोयल, सेवानिवृत्त प्राचार्या कविता पाटील, पतंजली योगपीठाचे राज्य कोषाध्यक्ष पी. आर. सुलताने, डॉ. राजेश सराफ, समाजसेवक प्रदीप पाटील अवचार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डिगांबर काकड यांनी केले. यावेळी अमोल पाटील अवचार यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ही बातमी वाचा –  प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!

 

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर यांनी प्रदीप पाटील अवचार यांच्या व्यावसायिकतेसोबतच त्यांच्या समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव कथन केला. गरीब–श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारे, समाजाशी नाळ जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रदीप पाटील अवचार असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

 

नैतिक अवचारच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम शेगाव शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Scroll to Top