shegaon nagar palika ward No 4

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!

शेगांव- शेगांव शहराच्या प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यावेळी या प्रभागातील जातीय समिकरणे आणि मतविभाजन हा मुद्दा जोमाचा ठरत आहे. या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार यांनी हा गड कायम राखण्याच्या दृष्टीने पायाबांधणी ही भरभक्कम केली असली तरी यावेळी या प्रभागात युवकांची मुसांडी हा चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार हा रणनितीकार असावा हा जरी महत्वाचा मुद्दा असला तरी यावेळी या प्रभागात निवडणुकीच्या माध्यमातुन उतरलेली युवा पिढी नव्या क्रांती भाषा वापरत असुन प्रभागातील सत्ताकारण परिवर्तनासाठी तत्पर असल्याचे वास्तव्य मागील दोन दिवसापासून च्या प्रचार सत्रात अनुभवयास येत आहे.
यावेळी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार  हा जरी नवखा असला तरी या प्रभागावासियांच्या सहवासात अनेक पिढ्यांचा असलेला सहसबंध आणि एकमेकाबद्दल असलेली अापुलकी हा जिव्हाळ्याचा बनत असल्याचे चित्र पहावयास मिळत  आहे. तर ओवे परिवाराचा  सलोखा यावेळी आणि विविध सामाजिक घटकांशी असलेली बांधिलकी यावेळी जमेची बाजु ठरणार असल्याचे जणु भाकितच या प्रभागातील मतदारांकडून व्यक्त असल्याने या प्रभागात होणारी लढत ही चुरशी ठरत आहे.
मुस्लीम बहुल व विविध समाज घटकाच्या नागरिकांचे वास्तव्य या अगोदर आगळ्या वेगळ्‍या स्वरुपात असल्यामुळे सत्ताधारी उमेदवारांना या प्रभागाचा खडा न खडा जरी परिचीत असला तरी यावेळी युवक आणि काँग्रेस नेतृत्व यांनी सुध्दा ही निवडणुक प्रतिष्ठीतेची केली असल्यामुळे  वातावरण तापत असल्याचे चित्र आहेे. तर हा प्रभागात झालेली मतविभागणी यावेळी कळीचा मुद्दा ठरु शकते.
तर या प्रभागात सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्व यांनी सुध्दा सर्वस्वपणाला लावले असले तरी यावेळी युवकांचा प्रचार आणि संवाद शैली ही नवखी जरी असली तरी या प्रभागवासीयांकडून आपलेपणाची भुमिका दर्शवित आहे. त्यामुळे यावेळी जुन्या जानकारांना महत्व देणार की, नव्या युवकांना संधी देणार हे येणाऱ्या काळात निश्चीत होणार असले तरी प्रचारात मात्र युवकांनी बाजी मारली असल्याचे चित्र प्रसारमाध्यमे  सोशल मिडीयातुन प्रामुख्याने जाणवत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तरी आता जनतेचा कल हा  परिर्वतनाचा असेल वा तो सत्ताधाऱ्यांना पुन्हा गड कायम राखण्यास मदत करेल हे दि. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रीयेतुन दि. 21 डिसेंबरला जरी समोर येणार असले तरी या प्रचारात अनेक चर्चामुळे शेगांवकरांच्या चर्चेतला विषय ठरला आहे हे वास्तव्य नाकारता येत नाही हे पण तितकेच सत्य  आहे.
Scroll to Top