election shegaon

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले!

सत्ताधाऱ्यांना प्रभागाचा गड कायम राखण्याचे आव्हान!

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रलंबित असलेला आणि प्रारंभीपासून चर्चेत असलेला प्रभाग क्र.4 मध्ये अस्तिवाची लढाई असल्याचे चित्र आता जनमानसातून चर्चेत येत असल्याने यावेळी या प्रभागात सत्ता काबीज करण्याची या लोकशाहीच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या वळणावर येवून ठेपली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात प्रचाराचा पहिला नारळ फुटल्यानंतरही ऐन दोन दिवस अगोदर प्रचार थांबवावा लागला होता आता नव्याने निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कालपासून प्रचाराचा धामधुम ही प्रभागात सुरु असली तरी यावेळी या प्रभागात विरोधात उतरलेली युवा पिढी ही नव्या जोशाने कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारार्थतर शेगांव शहर काँग्रेस संपुर्ण अवरतल्याची चर्चा आता प्रभागवासीयांकडून चर्चेची ठरू लागली आहे. तर हा प्रभाग कायम सत्ताधारी पक्षाकडे कायम ठेवण्याकरीता केलेली रणनिती व मांडण्यात आलेले डावपेच हे दि. 20 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेपर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान असल्याचे राजकीय जाणकारांचे मत अाहे. तर ही निवडणुक नक्कीच चर्चेची आणि मत मतांतराची ठरणारी आहे.

 

ही बातमी वाचा –जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का?

या प्रभागातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील समिकरणे ही खरोखरच सत्ताधाऱ्यांच्या दिशेने प्रभावी असली तरी यावेळी युवकांचे आगमन आणि जुन्या पेक्षा नव्या चेहऱ्यांना पसंती देण्याकरीता युवा पिढीचा सतर्कतेचा पुढाकार हा सत्ता परिवर्तनाची नांदी ठरतोय. मागील सत्ताकाळातील राजी नाराजीचे सुत्रे सावरण्याची क्षमता ही असतांनाही यावेळी विरोधक व शहरातील इतर नेतृत्वांनी सुध्दा यावेळी मतविभाजन हा महत्वाचा मुद्दा असल्याचे नमुद केले आणि विविध समाजाच्या युवकांनी ही निवडणुक खांद्या डोक्यावर घेतल्याचा फटका आता सत्ताधाऱ्यांकडे रोख करणारा असल्याचे बोलल्या जावू लागले आहे. तर या प्रभागात राष्‍ट्रवादीच्या घडाळीचा गजर सुध्दा जातीय समिकरणामुळे टिकटिक कायम ठेवण्याचा वाटेवर असले तरी या प्रभागात राखीव गटाचा वंचित चा उमेदवार यांचे या प्रभागातील इतर समाज घटकांशी आपलेपणाचे असलेले संबध हे सुध्दा जमेचे समिकरण बनविण्याच्या तयारीत आहेत.

 

तर सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व यांनी सुध्दा यावेळी हा प्रभाग कायम ठेवण्याकरीता प्राण पणाला लावल्याचे चित्र आता दिसून येत असले तरी यावेळी या प्रभागातील मतदार याद्याबाबतचे आक्षेप आणि प्रभागातील कपात झालेली मतेे यामुळे या प्रभागात जनता जनार्दनच्या बळावर असलेली ही निवडणुक आता काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराच्या अनुषंगाने प्रतिष्‍ठेची ठरत अाहे.

 

तर त्यासाठी सर्वस्वी पणाला लावण्याचा जणु बेतच काँग्रेसच्या या भुमिकेतुन दिसून येवू लागला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सत्ताधारी व युवा पिढीच्या हालचाली या सुध्दा प्रतिष्ठेच्या असल्याची वास्तविकता आता जाणवू लागली आहे. तरी थंडीच्या या वातावरणातही प्रभाग क्र. 4 च्या वातावरणात राजकारणाच्या आगीमुळे कडक उन्हाचे चटके जाणवत असून ही अाग दि. 20 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीया झाल्यावरच थंडावेल असेही बोलल्या जावू लागले आहे.

Scroll to Top