जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का?

शेगांव उड्डाणपुलावरील हा खड्डा जिवघेणा, संबधित प्रशासनाची बघ्याची भुमिका

शेगांव- शेगांव शहराच्या हितासाठी असलेल्या नागरी सुविधा असल्या तरी त्यावर लक्ष देण्याकरीता असलेले प्रशासन फक्त मंत्र्याच्या आगमनानिमित्त सज्ज असल्याचा अनुभव शेगांव करांनी अनुभवला आहे. स्थानिकाच्या हितासाठी असलेल्या सुविधांची दुरुस्ती व इतर कामाकरीता तक्रारी असतांना सुध्दा प्रशासन दिरंगाई करत असल्याचे वास्तव्य आता नागरिकांना अनुभवयास येत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेगांव शहरात असलेल्या उउ्‍डावपुलावर रेल्वे क्रासिंगच्या बाजुलाच पडलेला खड्डा आणि त्याच्या बाजुला साचलेला डांबराच्या कडक ढिगाचा खाच हा अपघातग्रस्त झाला आहे. या मार्गावरुन दुतर्फा वाहन ये- जा करीत असतात. एकाद्यावेळी आेव्हर टेक करीत असतांना विशेषतः दुचाकी वाहनांना मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा रात्री विजेच्या दिव्याचा अभाव असतांना हा खड्डा जिवघेणा ठरु शकतो त्यावर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी आता जनसामान्यांकडून होवू लागली आहे.

 

ही बातमी वाचा –वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु

 

रस्ते दुरुस्तीबाबत प्रशासन फक्त मंत्री महोदयांचेच!

शेगांवात उपमुख्यमंत्री यांचे आगमन होणार त्यावेळेस हे प्रशासन जागे झाले असून रस्त्या रस्त्यात चुरी टाकून टापटिप पणा दिखावा करण्यात धन्यता मानते तर शेगांवातील विविध चौकाचौकात पडलेल्या खड्याबाबत कानाडोळा करीत असते. याबाबत अनेकदा तक्रारी सुध्दा करण्यात आल्या असल्या तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भुमिका असल्याची प्रतिक्रीया जनमानसात असल्याचे वास्तव्य आता दिसून येत आहे.

Scroll to Top