शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत असलेली उत्सकुता ही निकालाअभावी लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीच्या प्रचार काळात आणि मतदान प्रक्रीयेत झालेला गोंधळ पाहता अनेकाविध चर्चा दि. 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेतुन चर्चिल्या जात असतांना त्या चर्चेचा आजचा 6 वा दिवस संपला असला तोच आता प्रभाग क्र. 4 हा पुन्हा चर्चेत आला आहे. तो प्रलंबित असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने…
प्रभाग क्र. ४ हा शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पुर्वीपासूनच चर्चेत आला आहे. या प्रभागातील प्रभाग रचना आणि त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुनावणी व त्यानंतर योग्य न्याय न मिळाल्याने तक्रारकर्त्यांची निवडणुक आयोगाकडील तक्रार यामुळे अनेक आगळेवेगळे पडसाद चर्चेत आले होते. तर मतदार यादी व सिमांकानाबाहेरील मतदारांचा समावेश झाल्याचा मुद्दा सुध्दा उपस्थित झाल्याने आणखी चर्चा रंगल्या तर तर काँग्रेस उमेदवारांकडून भरण्यात आलेला अर्ज सुध्दा निकाली काढण्यात आला असल्याने या प्रभागात सत्ताधारी पक्षाचा बोलबाला राहिल्याचा उत्साह होता. त्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबरला मतदान प्रक्रीया पुर्णत्वास झाली आणि विजयाचे संकेत हे सत्ताधाऱ्याच्या दिशेने वळतील असे राजकीय तज्ञांचे वार्तांकन असले तरी निवडणुक आयोगाच्या निकषानुसार या प्रभागातील हरकती मुळे शेगांव प्रभाग क्र. 4 ची निवडणुक ही लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील राजकीय समिकरणे ही आता पुन्हा चर्चेत येवू लागली आहेत. या प्रभागात मागील निवडणुकीत पराभव झालेले तसेच या निवडणुकीची तयारी करुनही या निवडणुकीमध्ये सहभाग न घेतलेल्या बुध्दी चातुर्य युवकाच्या निलेश घोंगे या नावाची चर्चा हा महत्वाचा मुद्दा आहे.
तरी या निवडणुकीत आता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे प्राबल्य आणि माजी नगरसेवकांची कार्यपध्दती याबाबत अनेक चर्चा रंगत असल्या तरी यावेळी या प्रभागाच्या निवडणुकीत कोणती भुमिका ही मतदारांची असणार हा सुध्दा आता चर्चेचा मुद्दा ठरत आहे. तर यावेळी प्रभाग क्र. 4 हा सुध्दा काँग्रेस नेतृत्वांनी प्रतिष्ठेचा मुद्दा म्हणून या प्रभागात घेतलेली भुमिका हा प्रभागाचे राजकीय समिकरण वेगळया पध्दतीने अधोरेखित करीत असल्याचे वास्तव्य आहे. तर यावेळी वंचित बहुजन आघाडीची मागास प्रवर्गाची राखीव जागेचा उमेदवार हा सुध्दा यावेळी आपली वैयक्तीक शैली आणि नव्या उमेदीचा असल्याने यावेळी या प्रभागामध्ये कोण सिकंदर होणार हा सुध्दा चर्चेचा मुद्दा ठरत असला तरी माजी नगरसेवक आणि निवडणुकीच्या रिंगणातील युवा पिढी यांच्या मताची गोळा बेरीज पेटीत जमा होण्याचा दिवस हा 20 डिसेंबर असल्याने या प्रभागात निवडणुक आयोगाकडुन नियमानुसार अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.
ही बातमी वाचा –शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय
तर या प्रभागाच्या निवडणुका लांबल्याने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य हे जनता जर्नादनाच्या हातात आहे हे वास्तव्य नाकारता येवू शकत नसले तरी या निवडणुकीत जिकंणे आणि हारणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याने या प्रभागात यावेळी दि. 20 डिसेंबर पर्यत हा प्रभाग पुन्हा चर्चेच्या भोवऱ्यात फिरणारा असला तरी या प्रभागाबाबत अनेक मते मतांतरे ही बोलल्या जात असली तरी शेगांवातील झालेल्या मतदानप्रकीया आणि मतासाठी झालेल्या आर्थिक देवाण- घेवाणीच्या प्रक्रीया या सुध्दा याबाबत अनेकांना चर्चेतुन सवड झाली तोच प्रभाग क्र. 4 च्या चर्चेला गतीमान पध्दतीने उत आल्याचे वास्तव्य आता पहावयास मिळत आहे. तरी आता येणाऱ्या काळात झालेल्या मतदार राजा नेमका कुण्याच्या बाजुने राहणार उभा! असा सवाल चर्चेचा ठरु लागला आहे. आणि बाजी कोण मारणार हा मुद्दा रंगु लागला आहे हे विशेष.
