प्रभाग क्र. 2 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – किशोर अंकुश शिंदे, सौ. कस्तुराबाई तराळे यंाना प्रभागवासीयांचा पाठिंबा
शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध रणनितीचा प्रकार पहावयास मिळतो तर यावेळी शेगांव नगर परिषदेचा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र.1 व प्रभाग क्र.2 मध्ये सन 2016 च्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने दोन्ही प्रभागातुन काँग्रेसला बाजुला सारुन भाजपाची एक हाती सत्ता काबीज केली होती.
तरी या प्रभागाचा विविध जातीय समिकरणाचा दांडगा अनुभव पाहता काँग्रेेसचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामविजय बुरुंगले यांची राजकीय व अभ्यासु ,खेळीतुन या प्रभागात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावेळी नगरसेवक पदाच्या उमेदवार देतांना नवतरुण असलेले आकाश तराळे यांच्या रुपाने त्यांच्या मातोश्री सौ.कस्तुराबाई महादेवराव तराळे तर विविध धार्मिक व सामाजिक कामात सक्रीय असलेले युवा नेतृत्व किशाेर अंकुश शिंदे यांची उमेदवारी नक्कीच चर्चेची ठरत आहे.
राष्ट्रीयकृत पक्षाने यावेळी अशा दर्जेदार नेतृत्वास दिलेल्या संधीमुळे नवतरुणांमध्ये चैतन्य निर्माण झाले असल्याची वास्तविकता यावेळी पहावयास मिळत आहे. प्रचार पध्दती आणि विविध सर्वांंगिण अभ्यासतुन दिलेले नवे चेहरे या प्रभागात विक्रम घडवू शकतात असा आशावाद प्रचार कालावधीत सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मिळत असलेल्या प्रतिसादातुन पहावयास मिळत आहे.
तरी प्रभागामध्ये सुपरिचीत असलेलेे आणि स्वच्छ प्रतिमा आणि शांत स्वभावाचे दोन्ही उमेदवार यावेळी काय भुमिका घेतात हे निवडणुकीच्या निकालातुन समोर येणार असले तरी यांना पाठिंबा मिळतेाय एवढे मात्र निश्चीत.
