नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!

आता जनसमान्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी आणि समस्याचे निराकारण हा दुरचा विषय असला तरी आता नेते मंडळी सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षाचा लहान मोठा नेता हा प्रत्यक्ष कामापेक्षा आणि जनसंपर्कापेक्षा सोशल मिडीयामध्ये सतर्क असल्याचे दिसून येते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

नेत्यांच्या सकाळपासून च्या संध्याकाळ पर्यंतच्या दिनचर्येचा पाढाच जणु त्यातुन मांडण्याचा घाट आता प्रसार माध्यमातुन पुढे येत असला तरी आता मुव्ही बनविण्याचा ट्रेंड सुध्दा आता नुकताच एका केंद्रीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त समोर आला आहे. आणि त्याकरीता जगाला दिशा देणारे दिशा दर्शक त्यावर काम करीत असल्याने या सोशल पोष्टवर जनसमान्यांच्या उमटत असलेल्या प्रतिक्रीया या त्या कतृत्वशैलीची वास्तविकता मांडणाऱ्या ठरत असल्याचे आता चर्चेचे ठरु लागले आहे. आजस्थितीला जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याकरीता असलेले लोकप्रतिनिधी यांची कर्तव्यतत्परता विसरल्याची चर्चा ही जनसामान्यात असतांना देखील या नेत्यांना प्रसारमाध्यमे थारा देत असल्याचा बोलबाला आता चर्चेचा ठरु लागला आहे.

ही बातमी वाचा – माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात

 

त्यामुळे लोकप्रतिनिधी हा जनसेवक असतो हे फक्त आता कागदावरच राहिल्याचे पहावयास मिळत आहे. तर नेत्यांच्या आजुबाजुला कधी काळी जुनाट दुचाकी फिरणाऱ्यांच्या आता लाखो रुपयांच्या चारचाकी झाल्याची बक्कळ उदाहरणे देता येतील. हे नेते निवडणुक काळात दिलेल्या अाश्वासनाला जागत नसल्याचे वास्तव्य असतांना यांचे चेले चपाटे हे भाऊ दादा करीत कौतुकाचा पसारा मांडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. आणि त्यातुन मिळणारी ठेकेदारी आणि आर्थिकतेचा स्त्राेत निर्माण करण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची मजल असते.

 

अनेक दशकापासून पत्रकारितेचे काम करणाऱ्यांना सुध्दा हे नेते तर सोडा यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाहीराती साठी भाव ताव करण्यात तरबेज असतात. आणि त्या जाहीरातीची रक्कम देण्यासही पत्रकारांना भाऊ दादा करावे लागते. पक्ष आणि पक्षाची धोरणे ही आता विकासाची वा सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची नसल्याचे आताच्या स्थितीची वास्तविकता पहावयास मिळून येवू लागली आहे. तरी नागरिकांनो दिखता कुछ है।औैर बिकता कुछ और है। ही म्हणण्याची पाळी आली आहे. तरी सोशल मिडीयामध्ये फालोअर्स वाढविणाऱ्या आणि वाढदिवस व कार्यक्रमाच्या माध्यमातुन समोर येणाऱ्या नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यापासून दुरच रहा.

Scroll to Top