प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न
शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वतीने काल दि.25 नोव्हेंबर रोजी प्रभागात प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जितुभाऊ सुळ, या प्रभागाचे उमेदवार सौ. वैशाली प्रमोद सुळ, व विनोद अशोक मसने यांच्यासह असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.
प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी, मुलभुत सुविधांच्या उन्नतीसाठी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरविण्यासाठी सक्षम, कर्तुत्ववान व जनसंपर्क ठेवणारे उमेदवार यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तरी शेगांव शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि सुव्यवस्थित नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी आपण सर्वांचे सहकार्य, आशिर्वाद अपेक्षित आहेत.
तरी या कार्यालय सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदायातुन विजयाचा जयघोष करण्यात आला.
प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 च्या भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प- जितुभाऊ सुळ
यावेळी मागील काळातील भाजपाचे माजी शिलेदार तथा न.प. उपाध्यक्ष सौ. ज्योतीताई कचरे, माजी नगरसेवक राजेंद्र कलोरे यांनी यावेळी आ.कुटे यांच्या साक्षीने या दोन्ही प्रभागात विजयाचा चौकार मारणार असल्याचे अभिवचन देत प्रचाराला सक्रीयता देण्याचे आवाहन केले.
