election

प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 च्या भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प- जितुभाऊ सुळ

शेगांव- शेगांव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 करीता प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र.2 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून प्रभाग क्र. 1 मध्ये सौ.पुजा खानापुरे व सचिन धनराज ढमाळ हे उमेदवार आहेत. तर प्रभाग क्र. 2 सौ. प्रमोद सुळ आणि विनोद मसने या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपाच्या वतीने दिलेल्या उमेदवारांना प्रभागावासीयांनी भल्या मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून दिला होता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Breaking News-उद्या अजितदादा शेगांवात!, न.प. निवडणुकीत येणार खरी रंगत

तरी आता यावेळी जनता जर्नादन आपल्या पाठीशी असून यावेळी सुध्दा भाजपा उमेदवारांना प्रभाग क्र. 1 प्रभाग क्र. 2 चे शिलेदार म्हणून नगर पालिकेत पाठवायचे आहेत असा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे असल्याचे आवाहन या प्रभागातील सामाजिक नेतृत्व जितुभाऊ सुळ यांनी कार्यकर्त्यांना भेटीगाठी दरम्यान केले अाहे. प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जावून मागील काळातील विकास आणि येणाऱ्या काळातील समस्यांचे निराकरण करण्याची हमी आपण या शिलेदारांच्या माध्यमातुन देत असल्याचे त्यंानी सांगितले.

त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते दिपक ढमाळ,विजय यादव, अशोक डांबे, सचिन काशिद, मो जाफर मो नजीर. ज्योतीताई कचरे, राजू कलोरे, वर्षाताई ढमाळ, विलास सोंडकर,संतोष बडोलिया,सचिन चव्हाण यांच्यासह असंख्य चाहत्यांची उपस्थिती होती. हे विशेष

Scroll to Top