राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर

उत्तरप्रदेशात असलेल्या बाहुबलीच्या धर्तीवर सुुरु असलेली दबंग शाही ही जणु राज्यात अवतरली नाही का? असा प्रश्न सद्याच्या नगरपालिका बिनविरोध निवडणुकीच्या निकालातुन समोर येवू लागला आहे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कधीेकाळी घराणेशाहीचा विरोध दर्शविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या माध्यमातुन आज स्थितीला घराणेशाहीला प्राधान्य देत पक्ष उभारणीसाठी असलेल्या स्थानिक नेतृत्वांना व कार्यकर्त्यांना वगळण्यात कुठलीच कसर न ठेवता दडपशाही वापरत दहशत निर्माण करण्याचे कट कारस्थान करीत ते उमेदवार बिनविरोध निवडुन आणण्याचा जणु घाटच बांधला असल्याचे आता राज्यातील नगर पालिका बिनविरोध झाल्याच्या घटनांमधुन समोर आले आहे.

 

ही बातमी वाचा –सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षे प्रशासकीय कार्यकाळ राहिला असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी आणि प्रशासन व्यवस्थापन संभाळणारे अधिकारी हाताशी धरुन प्रशासकीय यंत्रणेच्या नावाखाली सर्व नगर पालिका या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या हाताखाली असल्याने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना होवू घातलेल्या निवडणुकीत विजयाकरीता जणु प्रशासकीय यंत्रणाच कामाला लागली असल्याच्या तक्रारी सुध्दा झाल्या त्यामध्ये उमेदवाराला हित पोहचविण्यासाठी अपेक्षित प्रभाग रचना, मतदारांचा समावेश, मतदार याद्या प्रसिध्दी यातही सावळा गोंधळ असल्याच्या तक्रारी विराेधकांनी केल्या एवढेच नाही तर निवडणुक आयोगाच्या व सुनावणीच्या निकषाला बगल देण्याचे प्रकारही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले असतांना आता युपी बिहार च्या धर्तीवर असलेल्या बाहुबलीचा प्रकार आता सत्ताधाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नगर परिषदेवर आणुन ठेपल्याचे वास्तव्य आता अनुभवयास येत आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

दडपशाही आणि बेंबदशाहीच्या माध्यमातुन भाजपा व सत्ताधारी नेत्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना वगळुन यावेळी हुकूमशाहीचा वापर करीत घराणेशाहीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामध्ये जामनेर नगर परिषदमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कतेली यांना चिखलदारा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. इंद्रनिल नाईक राज्यमंत्री यांच्या पत्नीला पुसद नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

 

मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहीनी यांना खामगांव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. रामराजे निंबाळकर विधान परिषद माजी सभापती यांनी सुध्दा फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या मुलाला दिली आहे. मंत्री संजय सावकारे यांनी सुध्दा भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरीता आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही आपल्या पत्नीला दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरीता आपली पत्नीस उमेदवारी दिली आहे.

 

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगांव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरीता त्यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहेे. शिवसेना अामदार संजय खताळ यांनी आपल्या भावजयला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या पत्नीला दिली आहेे. भाजप नेते राजन पाटील यांनी अनगर नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदाकरीता आपल्या सुनबाईला उमेदवारी बहाल केली आहे.माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरीता त्यांचा भावाला उमेदवारी दिली आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई नगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरीता त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या उमेदवारीसोबत उमेदवार हे बिनविरोध निवडुन आणण्याचा घाट बांधण्यासाठी राजकीय दबावतंत्र वापरत असल्याचे विरोधकांकडुन बोलल्या जात आहे.

 

तर येणाऱ्या होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र येण्याची शक्यता ही वाढीस लागली असल्याचे नाकारता येत नाही. कारण ही दबंगशाहीच वा हुकुमशाही असल्याने येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या घटना विधानसभेसाठी झाल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय जाणकार बोलत आहेत.

Scroll to Top