प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…!

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 4 हा प्रारंभीपासूनच चर्चेत राहिला आहे. या प्रभागाच्या रचनेबाबत आणि सिमांकनाचे उल्लंघानाबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेली हरकत गाजली आणि त्यावर प्रभाग क्र. 4 चे प्रकरण जिल्हयापुरतेच नव्हे तर नगर विकास विभाग व राज्य निवडणुक आयोगाच्या दालनात तक्रारीच्या स्वरुपाने दाखल झाले आहे. स्थानिक मुख्याधिकारी यांची भुमिका ही सत्ताधाऱ्यांना हित पोहचविणारी असल्याची तक्रार सुध्दा तक्रारकर्त्यांनी समोर आणून दाखविली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

त्यामुळे या प्रभागात मतदार यादी प्रकाशानानंतर  असलेल्या हरकतीबाबत सुध्दा अनेक आक्षेप समोर आल्यावरही मुख्याधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाला बगल देत उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत घेतलेली सुनावणी ही सुध्दा तक्रारीच्या भोवऱ्यात अडकली या तक्रारीवर येथे कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी यांची बदली प्रशासनाला करावी लागली हे आता सर्वसामान्यांच्या चर्चेतुन समोर आले आहे.

 

या प्रभागात नेहमीच सामर्थ्याची भुमिका घेत आंदोलनात्मक वाटचाल करणारे निलेश घोंगे यांनी या प्रभागातील प्रशासकीय दबावाला उखडून काढण्याकरीता प्रभागरचेनेच्या सावळ्या गोंधळापासून ते मतदार याद्यातील गोंधळाची वास्तविकता उघड करण्याकरीता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेटीस धरण्याची सक्षम भुमिका घेतल्याने प्रशासनाने सुध्दा त्याची दखल घेतल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. आणि या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रीयेत सक्रीय असलेले निलेश घोंगे यांनी यावेळी काँग्रेसला सकारात्मका मिळावी आणि या प्रभागात नवा चेहरा यावा या उद्दात हेतुने निवडणुकीची जय्यत तयारी केली असतांना सुध्दा उमेदवारी दाखल केली नाही.

 

ही बातमी वाचा –बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता!

 

त्यामुळे या प्रभागात निलेश घोंगे यांची समाजमनावर असलेली पकड आणि विविध घटकातील समर्थक आणि चाहते यांची भुमिका ही निर्णायक ठरणार असल्याचा दावा आता जनसामान्यातुन जरी समोर आला नसला तरी या प्रभागात परिवर्तनाची नांदी आणणारा ठरु शकतो असा आशावाद या प्रभाागातील जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

 

या प्रभागातील काँग्रेस उमेदवारांच्या एबी फॉर्मच्या चुकीमुळे नागरिकांमध्ये चुकीचा भ्रम निर्माण होत आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असतांना आणि जाणकार तज्ञ नेत्याची फळी असतांना यात झालेली चुक या प्रभागातील जनतेच्या जिव्हारी लागली असल्याचे आता या प्रभागातील  काँग्रेस प्रेमींकडून बोलल्या जावू लागले आहे.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

निलेश घोंगे हे अनेक वर्षापासून राजकीय पक्षापेक्षाही स्वतः स्वच्छ प्रतिमा बाळगुन जनहिताच्या दृष्टीने कार्यशिलता जोपासत असतांना परिवर्तन करण्याकरीता पुरोगामी विचारधारेच्या पक्षाला पोषक वातावरण निर्मीती करीत या निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी न झाल्याने  हा त्यांचा चाहत्यांच्या सुध्दा जिव्हारी लागला आहे. कारण काँग्रेस उमेदवारांच्या पंजा निशानीला जपणारी  चाहत्यांची गर्दी ही जरी असली तरी यावेळी या प्रभागात आता उरलेल्या कालावधीत परिवर्तनाची नांदी आणण्याच्या दृष्टीने  या प्रभागातील जनता काय भुमिका घेणार हा  येणारा काळच दर्शवु शकतो, तुर्तास एवढेच

Scroll to Top