शेगांव- शेगांव नगर पालिकेचा बिगुल वाजल्यानंतर पक्षाच्या वतीने या नगराध्यक्ष पदासोबतच विविध प्रभागात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या प्रभागाचे नेतृत्व करण्याकरीता उमेदवारी साठी पक्षाकडे विनंती मागणीच्या माध्यमातुन साकडे घातले आहेत. परंतु यावेळी या प्रभागात आपला उमेदवार विजय गाठू शकतो का याची चाचपणी करुन उमेदवारी निश्चीत करण्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात पक्षश्रेेष्ठी हे सुध्दा तरबेज असल्याचे वातावरण मागील काही दिवसातील हालचालीवरुन अनुभवयास येत आहे. उदया दि. 17 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अद्यापपर्यंतही सर्व काही फिक्स असतांना घोषणा केली नसल्याची वास्तविकता आता समोर आली आहे आणि त्या मागाचे कारणही बंडखोरी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आता चर्चेची ठरु लागली आहे.
शेगांव शहरातील राजकीय समिकरणे पाहता तसेच मागील 2016 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता असल्याने या निवडणुकीकरीता नगराध्यक्ष पदासोबत नगरसेवक पदाकरीता इच्छुकांच्या यादीचा मोठा रिघ पहावयास मिळत असला तरी यांची व प्रभागाची सर्व समिकरणाचे अवलोकन कर्ता उमेदवाराची निवड हा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय राहील. तर या निवडीकरीता सर्व डावपेच आणि रणनिती आखीत पक्षांचे स्थानिक नेतृत्व यांची भुमिका ही खरोखरच महत्वपुर्ण असल्याने या काळात प्रसारमाध्यमासमोर येणे टाळले असून बंडखोरी वाढू नये आणि नावाची घोषणा अंतिम क्षणात केल्यास बंडखोरीला वाव मिळणार नाही. यांची भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
ही बातमी वाचा –भाजपा – शिवसेना शिंदे गट युती! जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल!
तर काँग्रेसच्या वतीने सुध्दा वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीचे संकेत हे सुध्दा अंतिम टप्प्यावरच्या हालचालीमुळे अाणि युतीच्या घोषणेमुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभागातुन निवडणुक लढविण्याच्या अनुषंगाने पाया भरणी केली असली तरी यावेळी कोणत्या प्रभागात आता कुणाला संधी द्यायची आणि कोणाला होकार द्यायचा याबाबत मोठा गांेधळ असला तरी बंडखोरीमुळे नाराज स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवरणे आणि प्रचार यंत्रणा तत्पर ठेवणे यामध्ये मोठी डोकेदुखी निर्माण होवू नये या अनुषंगाने कमालीची गुप्तता पाळण्यात यश आल्याचे चित्र आहे. तरी स्थानिक गुप्तता पाळली असली तरी ऐनवेळी नाराजीखातीर अपक्षांचा पोळा फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांना तिकीट मिळण्याची साशंकता अाहे. अशा अनेक इच्छुकांनी अपक्ष पर्याय निवडण्याच्या भुमिकेत असल्याचे वास्तव्य पहावयास मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
युवा पिढीचा उत्साह कायम
यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना आपले अस्तित्व सिध्द करण्याची धडपड असल्याचे सर्वच राजकीय पक्षातील होत असलेल्या हालचालीवरुन दिसून येत आहे. तर या निवडणुकीमध्ये पुर्वी गड संभाळणाऱ्यांना सुध्दा हा गड कायम ठेवण्याची अभिलाषा कायम असल्याने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी कितपत मिळणार आणि न मिळाल्यास त्यांची भुमिका हा पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो.
काँग्रेस, भाजपा व इतर राजकीय पक्षांच्या वतीने नगराध्यक्ष पदाची निश्चीती मात्र घोषणा गुलदस्त्यात
यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अजा प्रवर्गाकरीता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चीत झाले असले तरी या वेळी कोणता उमेदवार हा निश्चीत झाला आहे. याची घोषणा शेगांव शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने अधिकृत करण्यात आली नसून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या घोषणेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे हे विशेष.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
उद्या शेवटचा दिवस, निश्चीतीची अभावी इच्छुकांची धकधक वाढली!
शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याकरीता उद्या शेवटचा दिवस असला तरी पक्षांच्या वतीने नावाची घोषणा झाली नसल्यामुळे अनेक इच्छुकांनी उमेदवारी साठी अर्ज दिला असला तरी याबाबत प्रभागात भेटी गाठी घेण्यापेक्षाही आपले तिकीट राखले जाणार, की कायम राहणार यांची धकधक वाढीस लागल्याचे चित्र हे अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत आहेत. तरी उद्या शेवट प्रतिक्षा करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचे चित्र आहे. तर अनेक जण आपल्या चाहत्या नेतृत्वांकडे घिरट्या मारत असल्याचे चित्र शेगांवातील राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यालयासमोरील गर्दीवरुन अनुभवयास येत आहे. हे विशेष.
