शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आज सांयकाळच्या सुमारास निवडणुकीमध्ये वेगळे ट्विस्ट घेतल्याचे दिसून आले आहे. राज्यात महायुती असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती झाल्याची समिकरणे समोर येवू लागली असली तरी या जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल होणार असल्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहे.
उद्या दि. 17 नोव्हेेंबर 2025 हा नगर पालिका निवडणुकीच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहेे ती या अंतिम टप्प्यामध्ये ही बोलणी आटोपली असून त्यांच्या युतीचे फोटो आणि चर्चा सोशल मिडीयातुन प्रसारीत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजपा यांची तिकीट वाटपाची समिकरणे आजपर्यंत जुळली नसल्याने यावेळी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याचे राजकीय वातावरण मागील काही दिवसापासून सक्रिय असल्याचे दिसते.
ही बातमी वाचा –प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी!
तर शिवसेना शिंदे गटाची भुमिका युतीबाबत स्पष्ट होती. करीता त्यांनी मागील काही दिवसापासून शंाततेची भुमिका बजावली असल्याने यावेळी आज या युतीच्या माध्यमातुन शिवसेना गटाला जागा वाटपाचा फार्म्यंला कसा निश्चीत होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना शिंदे गट व भाजपा युती होणे हे शक्य नसल्याच्या चर्चा असल्या तरी राजकारणात काहीपण शक्य असल्याचे संकेत शिवसेनेचे स्थानिक नेते व राजकीय पुढाऱ्यांची संधीचं सोनं करण्याची गतिमानता यातुन शेगांवकरांना अनुभवयास मिळाली असून या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुध्दा हे युतीच्या माध्यमातुन रिंगणात उतरणार असल्याने अनेक चर्चांना आता तरी पुर्णविराम लागला आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
तर यावेळी भाजपा शिवसेना शिंदे गटाला कोणत्या जागा देणार यावर चर्चाचे वारे जोमात वाहू लागले आहे. आता या चर्चा अनेकाविध पध्दतीने रंगत असल्या तरी या सर्व बाबींना उद्या संध्याकाळपर्यंत पुर्णविराम बसेल एवढे मात्र निश्चीत.
