शेगांव- शेगांव नगर परिषद निवडणुक कार्यक्रम घोषित झाली असल्याने मागील 9 वर्षानंतर या जनसमान्यांच्या उत्सवाची जय्यत तयारी आता विविध पक्षांच्या माध्यमातुन सुरु असतांना दिनेश साळुंके यांची झलक सबसे अलग अशा धर्तीवर असल्याने या निवडणुकीत आज उमेदवारी दाखल करतांना त्यांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय, समर्थक आणि चाहत्यांच्या गर्दीमुळे या प्रभागात निवडणुक लढविणाऱ्या इतर उमेदवारांना धडकी भरल्याची वास्तविकता त्या गर्दी व पाठबळातुन दिसून येत होती.
प्रभाग पाच मध्ये सन 2016 च्या नगर पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात युती झालेली नसतांनाही या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुक लढण्याचा कयास कायम ठेवला होता. आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली तरी आताही सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचा गजर कायम ठेवण्यासाठी त्यांची तत्परता कायम आहे. आज त्यांनी अनेक समर्थकांसह नगर परिषदेत शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ही बातमी वाचा –युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती!
सत्तेत असो वा नसो नगरसेवक असो वा नसो त्यांनी शेगांव शहरातील विविध विकास कामाकरीता निधीची उपलब्धता करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु असते. सामाजिक आणि राजकीय पटलावर नवी छबी निर्माण करण्याचे काम ते आपल्या शैलीतुन करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी या प्रभागाचा अभ्यास करुन यावेळी निवडणुकीचा निर्धार केल्याचे चित्र आजच्या उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रीयेतुन समोर आले आहे. हा प्रभाग लढणे नक्कीच जोखमीचे असले तरी या प्रभागात जनतेच्या मनातील नगरसेवक होण्याची अपेक्षा बाळगत त्यांनी आज उमेदवारी दाखल केली आहे. तरी या प्रभागाची लढत ही नक्कीच चुरशीची झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे मात्र निश्चीत.
