lack of worker

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा!

अाज स्थितीला विधानसभालोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आणि शक्तीप्रदर्शनाकरीता असलेला जमाव जमा करण्यासाठी नेत्यांना मोठी मनी पावर वापरावी लागली असली तरी आता सद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवाराला आपला कार्यकर्ता नसल्याने  मनी पावरचा वापर करुन विकत घेतलेले कार्यकर्ते वापरण्याची पाळी येणार असल्याचे वास्तव्य आज सर्वच पक्षांसमोर असल्याचे .िदसत आहे. तरी या निवडणुकीत पदाधिकारीच असल्याने कार्यकर्ते संपल्यात जमा झाल्याचे दिसत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

शेगांव -नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी आता पक्षांकडे काम करणारे आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आता संपुष्टात आल्याचे वास्तव्य आता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अनुभवयास येत आहे. मागील  चार वर्षाच्या कार्यकाळात शेगांव नगर परिषदवर असलेली प्रशासकीय जबाबदारी आणि सत्ताधारी आणि विरोधकांची पक्ष नेत्यांची संपलेली भुमिका पाहता आता या निवडणुकीत इच्छुकांची जरी गर्दी असली तरी कार्यकर्ता हा महत्वपुर्ण ठरणार आहे. कारण पक्षातील विघटन आणि गटातटाच्या राजकारणात कार्यकर्ता संपुष्टात आला आहे.

 

मागील 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली अशा स्थानिक पक्षांच्या नेत्यांनी युवकंाना व कार्यकर्त्यांना वाव न दिल्याचा परिणाम आता यावेळी स्थानिक प्रभागातील उमेदवारांना सोसावा लागणार आहे. राजकीय सत्ता उपभोगत असतांना स्थानिक नेत्यांनी स्वतःचा चांगभलं केल्याचा प्रकार ही जनता हेरून असल्याने त्यांच्या पाठीशी आज कुठलाच कार्यकर्ता  नाही. हे कटु सत्य सर्व पक्षाच्या नेतृत्वांना मान्य करावेच लागणार आहे. आणि त्या कारणामुळे लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचाराकरीता कार्यकर्तें  सुध्दा हक्काचे नसल्याने मनी पावरचा वापर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्याचा परिणाम हा निवडणुका महागल्या आहेत यात शंका नाही.

 

ही बातमी वाचा – मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच!

 

स्थानिक पातळीच्या प्रभागातील सर्वेक्षण केले असता राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला सुध्दा  हमखास विजयी उमेदवार शोधणे  कठिण्यपातळीचे ठरत आहे. हे आता पक्षनेत्यांना बोलणे शक्य नसले तरी ही वास्तविकता नाकारता येत नाही.

 

कधीकाळी पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष  व  शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन विविध वार्डामध्ये शाखांची उभारणी करण्याची प्रथा असायची परंतु अाता पक्षाचे कार्यकर्तेच पदाधिकारी झाल्याने त्यांच्या माध्यमातुन कार्यकर्ता नसल्याचे पहावयास मिळत आहे. सोशल मिडीयाचा वापर वाढल्याने अनेक उमेदवार हे फक्त सोशल मिडीयातील एजन्सीवर मोठा खर्च करीत असले तरी त्यांचा शेजारी सुध्दा त्यांच्या पार्श्वभुमीबद्दल ज्ञात नसल्याने यावेळी कार्यकर्ता हा महागडा ठरणारा आहे.

 

मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शहराच्या कार्यकारणीची जबाबदारी ही आता कृतीशील नसल्याचे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना सुध्दा मान्य करावे लागले. अनेक पक्षांच्या माध्यमातुन आॅनलाईन सभासद नोंदणीला प्राधान्य दिले असल्याने बहुतांशी कार्यकर्ते हे अनेक पक्षांशी हित संबध जोपासत आहेत. कारण डेटा तपासण्यापुरताही स्थानिक नेत्यांना वेळ उरला नाही.

 

माजी लोकप्रतिनिधींनी सुध्दा प्रभागातील विकासाच्या कामातुन मिळणारा कमिशन टक्का, आर्थिकतेचे चांगभलं करण्याची दुकानदारी जोपासली असली तरी आर्थिक लाभासाठी त्यांच्या जवळची आणि बोटावरची मंडळी वगळता त्यांच्याकडे सुध्दा कार्यकर्ता दिसून येत नाही. एवढेच नाही तर प्रभागातील माजी लोकप्रतिनिधींना  प्रभागातील नागरिकांसोबत मागील सत्ता काळात आपुलकीला प्राधान्य दिले नसल्याने आता युवा पिढीने सुध्दा दुरावा निर्माण करीत आपल्या वैयक्तिक जिवनाला वेगळे करण्याचा अनुभव आता प्रत्यक्षदर्शनी जाणवत आहे.

 

पुर्वीप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी घोषित होण्याची कार्यकर्त्याचा जथ्था आता नष्ट झाला असल्याने आता कार्यकर्ते मनी पावरचा वापर करुन वापरावे लागणार असल्याची शोकांतिका आहे.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

राजकीय पक्षांमध्ये विविध सेल जरी कार्यरत असले तरी त्यात फक्त पदाधिकारीच मिरवत असतांना पक्षांचा उद्देश हा जरी पक्ष संघटनाचा असला तरी त्यांची कार्यकारणी ही सुध्दा कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात विविध सेलच्या संघटनात्मक कामाकरीता एकत्रित येण्यास कुठलाच वाव नसल्याचे ऐकावयास मिळते. तरी अनेक कारण मिमांसा स्पष्ट करण्यामध्ये एवढेच सांगावयाचे आहे की, पक्ष आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागील कृतीशिलतेचा फटका हा बसला असला असल्याने कार्यकर्ताच्या अभाव ही  बाब गांभीर्याची आहे. यावर कुणीही स्पष्टता व्यक्त करु शकत नाही हेच कटु सत्य!

Scroll to Top