प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज!

प्रभाग क्र.1 ची जातीय समिकरणे कोलमडण्याची शक्यता!

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या माध्यमातुन होवू घातलेल्या निवडणुकीसाठी शेगांव शहराच्या राजकारणामध्ये प्रभाग क्र.1 हा नेहमीच महत्वपुर्ण राहिला आहे. कधी काळी या मतदार संघावर काँग्रेस चे प्रभुत्व कायम असले तरी सन 2016 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते जितेंद्र सुळ यांच्या नेतृत्वात  प्रभाग क्र. 1 व 2 भाजपाचे कमळच फुलले होेते. तरी यावेळी प्रभाग क्र.1 मधुन जनतेच्या आग्रहास्तव संताेष जाधव हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची चर्चा आता जनसमान्यातुन होवू लागली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

आजच्या युगामध्ये संविधानाने सर्व सामान्य नागरिकांना हक्क दिला असल्यामुळे आपले नशीब अजमाविण्याकरीता संतोष जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने लवकर अर्ज प्रक्रीयेला सुरुवात करीत असल्याची माहिती त्यांनी जनसमूहशी बोलतांना दिली. मागील निवडणुकांमध्ये आम्ही इतरांसाठी काम केले असले तरी यावेळी जनता आमच्या सोबत काम करण्यास तयार असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.

 

तरी आता होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने परिसरातील तसेच प्रभागातील युवा चाहत्यांच्या वतीने यावेळी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी पाठिंबा मिळत असल्याने यावेळी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली असल्याची माहिती संतोष जाधव यांनी दिली. यावेळी होणारी निवडणुक ही जरी चुरशीची असली तरी आता निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण ही आपला हक्क बजावणार असल्याचे  प्रतिपादन करणार असल्याचे संतोष जाधव यांनी ठामपणे मांडले आहे.

ही बातमी वाचा –प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार!

 

शेगांव नगर पालिकेच्या दृष्टीने प्रभाग क्र.1 हा महत्वपुर्ण निवडणुकीचा बालेकिल्ला असला तरी यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून संतोष जाधव यांचा सहभाग राहणार असल्याने जातीय समिकरणे प्रभावित होतील असा सुर जनतेतून समोर येवू लागला आहे. त्यामुळे या प्रभागातील सामाजिक समिकरणे आणि जातीय सलोखा संभाळणाऱ्याकडे या प्रभागाचे नेतृत्व जाणार असले तरी यावेळी या प्रभागात काँग्रेसचा सुध्दा बोलबाला असला तरी मागील निवडणुकीतील विजयाची रणनिती आखण्यात भाजपा कुठलीच कसर सोडणार नाही.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा या प्रभागात विजयाचा झेंडा फडकवला असून  या प्रभागात मताची मक्तेदारी संभाळलेली आहे. तरी आता ही निवडणुक चुरशीची ठरणार असली तरी संतोष जाधव यांची उमेदवारी ही अनेकांना प्रभावित करणारी ठरणार आहे यात कसलेच दुमत नाही.

Scroll to Top