दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी

कर्जतच्या ऐनाची वाडीत राहणाऱ्या आदिवासी तरुण नयन वाघची कर्तव्यतत्परता

स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्कीच अग्निपरीक्षा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी तरुणाने एमपीएससी च्या परीक्षेत बाजी मारली असून राज्यात 15 वा क्रमांक मिळविला आहे. त्याची तत्परता नक्कीच आजच्या युवा पिढीला दिशा देणारी ठरणारी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ऐनाची वाडी ही अदिवासी समुहाची वस्ती या कुटुंबामध्ये शिक्षणाचा अभाव असतांना मुलाने शिकाव यांकरीता वडील विठ्ठल वाघ यांनी मेहनत घेतलली आणि मुलाला दहावीपर्यंत पोहचवुन दोन प्रयत्नात त्याला यश न मिळाल्याने त्या मुलाची शिक्षणाबाबतची आशाच सोडून दिली परंतु शिक्षणाच्या या वळणावर एक शिक्षक त्यांच्या सहवासात आले आणि त्याच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. येणाऱ्या अनेक संकटाचा सामना करीत नयन वाघ याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देत राज्यातुन तो आदिवासी विभागातुन 15 वा आला आहे.

सव्वाशे-दिडशे नागरिकांच्या वस्तीवर विठ्ठल वाघ यांचं कुटुंब राहत होते. मुलाला शिकवायाचं असा वडीलांचा ध्यास होता परंतु मुलगा दहवीत नापास झाल्याने त्यांनी सुध्दा आशा सोडली असल्याने नयन आता मजुरी करण्याकरीता जावू लागला. शिक्षक पुंडलिक कंटे यांच्याकडे मजुरी काम करतांना शिक्षकाने त्याच्या विचारपुस करीत शिक्षण घेण्याचा आग्रह केला. त्यावर नयन न घेतलेली जिद्द पाहता दहावीतील विषय सहज रित्या सोडून बारावीसाठी महाविलयातुन प्रथम क्रमांक पटकवला . कर्जत कोकण विद्यापीठातुन पदवी संपादन केली. त्यांनतर पोलीस भरती करीता प्रयत्न केले.

ही बातमी वाचा –आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

 

अनेकवेळा थोडक्यात संधी हुकलील असली तरी त्याने सन 2019 मध्ये एमपीएससी ची तयारी सुरु केली. त्यासोबत मजुरीचे काम करीत शिक्षणासोबत घरांच्याना सुध्दा हातभार तो लावत राहीली. त्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या. त्यातच घरच्यांनी त्याचे लग्न झाले, लग्नानंतरही त्याने आपले स्वप्न अंगिकारले होते. त्याच कालावधीत वडीलांना अर्धांग वायुचा झटका आला.त्याकारणाने घराची जबाबदारी सुध्दा नयन वर आली. त्यामुळे 2022 साली त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन एमपीएससी परीक्षेचा सराव सुरु केला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारिरिक चाचणीत पायाला इजा झाल्याने त्याची संधी गेली त्यावर वॉकर घेवून 2024 मध्ये एमपीएससी ची पुर्व परिक्षा दिली.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

पत्नीने शिवकाम करत पतीला केली मदत

लग्न झाल्याबरोबरच सहा महिन्याच्या आत नयन वाघ याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केल्याने , पत्नीची परवड होवू नये म्हणून तीला माहेरी पाठवून दिले परंतु त्याची पत्नी पदवीपर्यंत शिकली असल्याने तिने शिवणकाम करीत नवऱ्याची स्वप्ने साकार करण्यासाठी मदत करुन हातभार लावला आहे.

Scroll to Top