प्रशासन कर्मचारी आणि राजकीय पक्षाच्या इच्छुकंाच्या भुमिकेबाबत मनसेचे सतर्कता कायम असल्याचा जिल्हाध्यक्षाचा दावा
आता निवडणुकीचा काळ सुरु असला तरी राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या भेटी देणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु नगर परिषद कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यांना सोबत घेवून काही राजकीय पक्षाचे नेते नागरिकांच्या घरी जावून भेट घेत असल्याबाबतचा खुलासा आज दुपारी मनसेच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी केला.
नगर परिषदेचे काही कर्मचारी आणि काही राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार एकत्र येवून नागरिकांच्या घरात फिरत असल्याचे संागत लोकांना सांगतायेत थकीत घरपट्टी भरा, नळपाण्याचं बिल भरा, आम्ही तुमचं घर तुमच्या नावावर करुन देतो! आणि हे सुध्दा प्रशासनाच्या अधिपत्याखाली होत असल्याचे त्यांनी पत्रक्ार परिषदेत सांगितले.
सद्या निवडणुकीचा काळ सुरु आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हालाही आमच्या पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांना घेवून न.प.कर्मचारी अपेक्षित असल्याचे संागितले. त्या कर्मचाऱ्यांचे आवश्यक ते मानधन देण्याची सुध्दा आमची तयारी असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. मागील काही दिवसापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सावळा गोंधळ सुरु आहे. आणि प्रशासनातील ते काही कर्मचारी अणि शेगांवातील राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार यांच्यावतीने सुरु असलेला प्रकार नक्कीच वेगळ्या वळणाचा असला तरी जिंकुन येण्याकरीता मते अपेक्षित असली तरी प्रशासनाचा गैरफायदा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
ही बातमी वाचा – बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश
तर आमच्या पक्षाच्या उमेदवाराला सुध्दा प्रशासनातील त्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे आवश्यक ते मानधन देण्यास माझी काहीच हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
शेगांव शहरातील काही प्रभागात हा प्रकार सुरु असल्याचा पुरावा व त्याचे व्हिडीओ फुटेज सुध्दा माझ्याकडे आहेत. आवश्यकता पडल्यास ते सादर करेल. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. ऐन निवडणुकीच्या काळात मनसेकडून करण्यात आलेला आरोप हा नक्कीच राजकीय वातावरण तापवणारा ठरणारा असला तरी निवडणुकीच्या काळात लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातुन यावर उजाळा टाकण्याचा हा मनसेचा प्रयोग तर नसावा अशी चर्चा आता या पत्रकार परिषदेतुन समोर येवू लागली आहे.
