दरवर्षीप्रमाणे नागपुर येथे होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुर मध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी नियोजित करण्यात आले आहे. तर सद्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजाकरीता मनुष्यबळाची कमरता येवू शकते त्या अनुषंगाने नागपुरातील अधिवेशन हे 8 ते 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलतांना संकेत दिले आहेत.
राज्यभरामध्ये ठेकेदारांनी सुुरु केलेले काम बंद आंदोलनाचा सुध्दा हिवाळी अधिवेशनावर मोठा आघात होण्याची शक्यता आहे. नागपुरात असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांची कामे सुध्दा प्रलंबित आहेत. 150 कोटी रुपयांची बिले थकीत असल्यामुळे ठेकेदारांनीच काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे नागपुर ऐवजी मुंबईतच अधिवेशन घेण्याची चर्चा सुरु होती.
ही बातमी वाचा – युट्युब च्या AI नवीन फ्युचर (Super Resolution)चा वापरकर्त्यांना होणार नक्कीच फायदा!
मात्र नागपूर करारानुसार विधीमंडळाचे एक सत्र नागपुरात घेणे बंधनकारक आहे. सद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक कार्यक्रमानुसार डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सर्व सरकारी यंत्रणा कामात असेल. त्या कारणाने या निवडणुका आटोपल्यानंतर हिवाळी अधिवेशन घेणे शक्य होईल. याबाबत विचार सुरु असला तरी तो निर्णय झालेला नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
