Declare ssc & hsc Exam Date 2026

दहावी बारावीच्या परीक्षेचे असे असणार अंतिम वेळापत्रक

राज्यामध्ये सद्या सुरु असलेल्या शैक्षणिक सत्राच्या दहावी व बारावीच्या  महाराष्ट्र राज्य  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2025-2026 च्या शैक्षणिक सत्राच्या दहावी बारावी च्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सन 2025- 2026 च्या शैक्षणिक सत्रातील दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक्‍  तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा 13 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये  कोणताही बदल न करता  मंडळाने तेच वेळापत्रक अंतिम वेळापत्रक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
सन 2026 ची फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येणारी दहावी बारावीची परिक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्यात करुन या वषर्र 18 मार्चपर्यंत दोन्ही परीक्षांचा शेवट करण्याचा मंडळाचा मानस आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लेखी, प्रात्याक्षिक व इतर परीक्षंाच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असे असणार परीक्षेचे वेळापत्रक

बारावीची लेखी परीक्षा
10फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
श्रेणी प्रात्याक्षिक, तांेडी परीक्षा, अंतर्गत मुल्यमापन – 23 जानेवारी  ते 9 फेब्रुवारी 2026
दहावीची लेखी परिक्षा 
20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
श्रेणी प्रात्याक्षिक्, तांेडी परीक्षा, अंतर्गत मुल्यमापन- 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी
असे असणार असल्याचे महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले आहे.
वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी करण्याची गरज
दहावी व बारावीच्या परीक्षा हा जिवनाला दिशा देण्याकरीता महत्वपुर्ण असल्याने या वेळी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी करणे गरजेचे आहे. तरी सखोल अभ्यास व सातत्यपुर्ण सराव ठेवावा असे तज्ञांकडुन सांगण्यात येत आहे.
Scroll to Top