आजच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मुलांचे भविष्य धोक्यात येवू नये याकरीता सतर्कता जोपासण्याकरीता महिला सरपंचाने पुढाकार घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे.आणि खरोखरच स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीची तत्परता आणि आपल्या गावकऱ्यांशी असलेले आपुलकीचं नातं जोपासण्याची तत्परता समोर येत असून या कृतीचं कौतुक होत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील टाेकावर असलेल्या सलगर खुर्द गावात मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असल्यामुळे या ठिकाणी चार शिक्षकाची आवश्यकता आहे. तरी सुध्दा शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी एकच शिक्षक शाळा चालवित आहे यामुळे गावातील भावी पिढीचे नुकसान होवू नये याकरीता या गावच्या महिला सरपंच यांचे शिक्षण डीएड झालेल्या सरपंचा आरती कांबळे यांनीच हातात खडू घेतला आहे.
तरी आज ग्रामीण भागात शिक्षकांचा अभाव असतांना प्रशासनाने राज्यातील हजारो युवक युवती उच्चशिक्षीत असतांना ते नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत तरी शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रीया गतीममान करण्याची मागणी आता होवू लागली आहे.
शासकीय शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली की, शिक्षक अतिरिक्त ठरतात, पण संख्या वाढली की, मात्र नवीन शिक्षक नेमण्यासाठी महिनोमहिने विलंब होतो अशी शोकांतिका पालक व्यक्त करीत आहेत.
सलगर गावामध्ये चार शिक्षकांची गरज असतांना एकच शिक्षक शाळा चालवित आहे. शिक्षक भरतीसाठी शासनाच्या वतीने प्रक्रीया जरी सुरु असली तरी तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता महीला सरपंचांनी शिकविण्याकरीता पुढाकार घेतला आहे.
सलगर खुर्द गावाची लोकसंख्या 1400 इतकी आहे या गावामध्ये पहिली ते चौथी पर्यंत 40 विद्यार्थी शिकत आहेत त्यांचे दोन वर्ग भरतात.
ही बातमी वाचा –दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ;शहरात घरफोडीच्या 3 घटना
पहिली व दुसरीचा एक वर्ग आणि तिसरी आणि चौथीचा एक वर्ग. त्यामध्ये 27 मुली, 13 मुलंाचा समावेश आहे. गावामध्ये पुर्वी एकच शिक्षक होता.त्यामुळे सरपंच रोज जात होत्या. मागील 3 महिन्यापासून अजून 1 शिक्षक दिला आहे. तरी आता अजुन दोन शिक्षक या शाळेला पाहिजेत अशी ग्रामस्थांकडून होत असली तरी शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी महीला सरपंच हे वर्गावर शिकवत आहेत. त्यांच्या कृतीचे गावभरासह कौतुक करण्यात येत आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
शासनाची वाट पाहत बसलो असतो, तर माझ्या गावची लेकरं शिक्षणापासून वंचित राहिली असती. फळा-खडु माझ्या हातात आला आणि मला जाणवलं सरपंच होण म्हणजे फक्त गाव चालवणं नाही, तर प्रत्येक लेकराचं भविष्य घडवणं आहे! चार शिक्षक मिळेपर्यंत आपण विद्यादान सुरुच ठेवणार आहे- आरती कांबळे सरपंच, सलगर खुर्द
