उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी!

राज्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम घोषित झाला अाहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा – सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!

 

त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करुन दि.17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आलेल्या आहेत. सदर हरकतीवर निर्णय घेणे करीता मा.जिल्हाधिकारी यांनी मा.उपविभागीय अधिकारी खामगांव याना प्रधिकृत केलेले आहे. तरी उद्या दि. 27 ऑक्टोंबर 2025 रोजी नगर परिषद,शेगांव येथे हरकतीवर निर्णय घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

तरी ज्या मतदार अथवा तक्रारदारांनी दाखल केलेल्या हरकतीवर उपराेक्त काही म्हणणे मांडावयाचे असल्यास नगर परिषद कार्यालय शेगांव येथे दि.27 ऑक्टोंबर 2025 राेजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवेदन सादर करण्यात येईल असे आवाहन जाहीर सुचनेच्या माध्यमातुन डॉ.जयश्री काटकर- बोराडे मुख्याधिकारी नगर परिषद,शेगांव यांनी केले आहे.

 

Scroll to Top