मागील काही दिवसापासून विशेषतः दसऱ्यापासून दिवाळी सणापर्यंत सोन्याच्या दरात उच्चंाक वाढत होता मात्र चांदीच्या दरात कमी जास्त दराची वाटचाल सुरु असली तरी मागील चार दिवसात सराफा बाजारातील खरेदी विक्रीच्या फलकानुसार चार दिवसामध्ये सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.
ऐन दिवाळीच्या काळात सोन्याचे दर हे लक्ष्मीपुजनापर्यंत वाढते होते परंतु लक्ष्मीपुजनानंतरच्या चार दिवसामध्ये प्रति तोळ्यामागे 8 हजार रुपयांनी घसरले आहे तर चांदीच्या दरामध्ये किलो मागे 38 हजार रुपयांची घट झाली आहे. दिवाळीच्या मागील आठ दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 1700 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली असली तरी फक्त मुंबई येथील सोने खरेदीचा उच्चांक हा 1100 कोटीचा होता. राज्यातील मुंबई, नाशिक,जळगांव पुण्यासह राज्या 460 टन सोन्याची विक्री झाली तर फक्त मुंबईमध्ये 320 टन सर्वाधिक सोन्याची विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ही बातमी वाचा –“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!”
मागील वर्षापेक्षा यावेळी सोन्याचा दर दुप्पट असला तरी यावर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे समोर आले आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
दिवाळीच्या प्रारंभी नरकचतुर्थीला प्रति 10 ग्रॅम सोने 1 लाख 31 हजार रुपयांनी विकले गेले तर चांदी प्रतिकिलो 1 लाखख 91 हजार रुपये दरांनेे विकली गेली. लक्ष्मीपुजनानंतर म्हणजे शनिवारी सोने दहा ग्रॅम 1 लाख 23 हजार तर चांदी प्रतिकीलो-1 लाख 53 हजार रुपयापर्यंत घसरली. अशी माहिती जळगंाव सराफा बाजारातील व्यापारी आर.सी.बाफना यांच्याकडून मिळाली आहे. दिवाळीच्या सणामध्ये मुंबई मध्ये प्रति दिवस 80 टन सोने विक्री झाली आहे.
शनिवारी मुंबई मध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम करीता 1 लाख 25 हजार रुपये तर चांदी प्रति किलो 1 लाख 51 हजार रुपये होते तर मुंबईत शनिवारीच चांदीच्या दरात 4 हजारांनी तर सोन्याच्या दरात 1800 रुपयांची घट आली हाेती. तर लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने प्रति 10 ग्रॅम 3 हजारांनी तर चांदी प्रतिकिलो 5 हजारांनी घसरली त्यामुळे राज्यातील महानगरामध्ये सोने 1 लाख 28 हजार प्रति तोळा तर चांदी 1 लाख 55 हजार प्रति कीलोचा दर होता.
