खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका
आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली
एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर परिश्रम घेत असतात. आणि अनेक वर्ष अभ्यास करीत असतात. त्याकरीता मुंबई पुणे आणि महानगरामध्ये या स्पर्धेचा अभ्यास करण्याकरीता हजारो रुपये खर्च करुन महागडे कोचिंग क्लास लावतात. मात्र या सर्व खर्चाला पुर्णविराम देत पाडळीतील वैभव भुतेकर याने ग्रामीण भागातच शिक्षण घेत तसेच कुठलाही कोचिंग क्लास न लावता एमपीएसीच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.
बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथील वैभव बबन भुतेकर असे त्याचे नाव असून भुतेकर याने महाराष्ट् लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतुन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण वर्ग एक पदावर त्याची निवड झालीआहे. आणि तो फक्त एमपीएसीची परिक्षा पासच झाला नाही तर तो राज्यातुन व्दितीय आला आहे. गावकरी मंडळीकडून मिळालेल्या माहितीनुसार महत्वकाक्षा बाळगणाऱ्या वैभवने आयुष्यासाठी खडतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला होता.
ही बातमी वाचा – निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग
पाडळी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, हायस्कुल पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर बुलढाणा येथील विदर्भ महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले. तर पदवीत्तर शिक्षण महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा येथुन एमएसडब्ल्युची पदवी प्राप्त केली.
वैभव ने ग्रामीण भागातून आभ्यासाची तयारी केली.कुठलेही क्लासेस त्याने लावले नाही.स्वबळावर नियमीत अभ्यास याच्या मदतीने त्याने आज यश संपादित केले आहे. या अगोदर सन 2021 मध्ये कर सहाय्यक पदावर त्याची नियुक्ती झाली त्यानंतर 2021 ला मंत्रालय लिपीक, आदिवासी शाळेवर गृहपाल तर सन 2023 मध्ये जालना जिल्हयातील वालसा खालसा येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर तो आजही तेथे कार्यरत आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
नुकताच 24 ऑक्टोंबर रोजी एमपीएससी चा निकाल लागला त्यानुसार त्याची सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) पदी निवड झाली आहे. एवढेच नाही तो राज्यातुन दिव्तीय आल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरी स्वतःच्या स्वकतृत्वाने पाडळीचे वैभव राज्यभरासह देशभर गाजविले असल्याने त्याचे सर्वोतोपरी कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शिक्षणांना देतात.
