शेगाव-अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, संत नगरी शेगाव शाखा व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन श्री माहेश्वरी भवन येथे भाऊबीजच्या पावन निमित्ताने करण्यात आले. हा उपक्रम सर्व अनुभवी डॉक्टर व मंच सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.
शिबिराचे उद्घाटन डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ. विष्णुगोपाल चौधरी व डॉ. नेहा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ही बातमी वाचा – लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती
दंत तपासणीचे कार्य डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ. विष्णुगोपाल चौधरी, डॉ. नेहा चौधरी, डॉ. मेघा अग्रवाल, डॉ. समृद्धी मूंधडा, डॉ. साक्षी अग्रवाल, डॉ. यश गोयनका, डॉ. राशि राठी, डॉ. साक्षी टिबडेवाल, डॉ. अंशु सराफ, डॉ. रिद्धी अग्रवाल आणि डॉ. गगन अग्रवाल यांनी पार पाडले.
शिबिरात एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या, तर निरोगी दात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन शेगाव शाखेचे अध्यक्ष राहुल अग्रवाल आणि शाखा मंत्री रोहित भूतडा यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रफुल मूहना, उपाध्यक्ष डॉ. राम धानुका, कोषाध्यक्ष सौरभ गोयनका, दीपक शर्मा, सागर अग्रवाल, शुभम मुरारका, अंकुश चांडक, सौरभ टिबडेवाल तसेच मयूर वर्मा, पंकज राठी, श्रीकृष्ण राठी, रोहित अग्रवाल आणि निखिल अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.
