भारत देशामध्ये पीएम सन्मान निधी ही केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांचे हित पाहता सुरु करण्यात आलली योजना असून या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरातुन सहा हजार रुपये मदतीचा लाभ देण्यात येत असतो. देशात या योजनेचे कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत. जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या करीता दिवाळी नंतर आनंदाची बातमी समोर आली आहे.
पीएम सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात एकाच वेळी सहा रुपये मिळत नाही तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा पध्दतीने लाभाचे वितरण करण्यात येत असते.
पीएम सन्मान निधी योजनेत पात्र असणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यत 20 हप्तातुन निधी देण्यात आला आहेे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मिर या राज्यात पीएम सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना दिवाळीपुर्वीच 21 वा हप्ता देण्यात आला आहे. कारण या राज्यामध्ये अतिवृष्टी, पुर परिस्थती असल्याने या राज्यामध्ये अगोदरच निधीचे वितरण करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
ही बातमी वाचा – जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश
महाराष्ट्रातही पुर परिस्थीती उदभवली असली राज्य शासनाची अपेक्षित सकारात्मक दिसून आली नाही.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात छटपूजेच्या निमीत्ताने या योजनेचा 21 हप्ता वितरीत करण्यात येवू शकतो.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून वृत्तसंस्थेस दिलेल्या माहिती नुसार पहिल्या नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल असे कळते.
