नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ गणेश दातीर,बलदेवराव चोपडे, मोहन शर्मा, राजेश पाटील, भाऊराव पाटील, सौ. कल्पना मसने, अनिता देशपांडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सारिका डागा,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ही बातमी वाचा – महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय
●जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषद सदस्य 24, पंचायत समिती सदस्य 48, नगरसेवक 141 आणि ग्रामपंचायती 200 निवडणुका होणार आहेत. “सक्षम उमेदवार द्या आणि निवडून आणा,” असे आवाहन त्यांनी केले.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
●राज्याचे कॅबिनेट मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी “भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची विविध शासकीय समित्यांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनाच स्थान दिले जाईल. पक्ष मजबूत करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काबीज करा.”असे आवाहन केले.
●आ. डॉ. संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,“बुथ मजबूत असणे ही विजयाची गुरुकिल्ली आहे. आपला गाव, सर्कल स्वतः सांभाळा. सत्ता आपली आहे — हा आपला प्लस पॉईंट आहे. दिवाळीनंतर नगरपरिषद निवडणुकीबरोबरच ग्रामीण भागातील जि.प. व पं.स. निवडणुकीच्या बैठका सुरू ठेवा. तीन उमेदवार तयार ठेवा, सर्वेक्षण करा आणि ठोस नाव निश्चित करा. जि.प. मध्ये 100% निकाल आपलाच हवा.”
● प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनीही कार्यकर्त्यांना “कामाला लागा” असे थेट आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदचंद्र गायकी व महेश पांडे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस ब्रह्मानंद चौधरी यांनी केले.
या कार्यशाळेत जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, अरुण पांडव, प्रमोद हिवराळे, महादेवराव मिरगे, शाम पाटेखेडे, सुरेश गव्हाळ, ज्ञानेश्वर साखरे, लता ताठे-देशपांडे, गोदावरी दही-बोंबटकार,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अनिल उंबरकर आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान लोकेश राठी, शाम अकोटकर आणि उमेश ताकवले यांचा सत्कार करण्यात आला.
