Chandrakant bawankule

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय

महसुलातील तलाठी भरतीत महसुल सेवकांना देणार प्राधान्य, तलाठी भरती साठी राखीव जागा- बावनकुळे

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महाराष्ट्र राज्यात महसुल विभागामध्ये नियुक्त असलेल्या महसुुल सेवक (कोतवाल) कर्मचाऱ्यांची मागणी होती की, महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. याबाबात महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन मागण्या करण्यात आल्या असता महसुल मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नुकतेच दि. 16 ऑक्टोंबर 2025 रोजी मुंबई येथे अायोजित बैठकीमध्ये कार्यरत असलेल्या महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा येत नसल्याचे सचिवांनी कळविल्यानंतर संबधित महसुल सेवक (कोतवाल) यांच्यावर अन्याय होवू देणार नाही अशी भुमिका राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतला असून महसुल सेवकांच्या बाबतीत नव्याने सकारात्मकतेची भुमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही बातमी वाचा – नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

 

या बैठकीमध्ये महसूल मंत्री यांनी सागिंगतले की, महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्या्च्या आजवरच्या सेवेचा अनुभव पाहता त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला. त्याचबरोबर ज्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांना 25 गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्दयावरही चर्चा केली यावर महसुल अधिकाऱ्यांनी सुध्दा सकारत्मकता दर्शविली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

 

तसेच महसुल सेवकांच्या इतर प्रश्नावरही सकरात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महसुलमंत्री यांनी बैठकीतुन दिले. महसुल सेवकांना यापुर्वीच मानधन वाढ देण्यात आली आहे. आता ऑनलाईन प्रक्रीया सुुरु झाल्यामुळे महसुल सेवकांचे बरेच काम कमी झाले आहे. अतिवृष्टी च्या काळात महसुल सेवक संपावर होते त्यामुळे अधिकाऱ्यांना नाहक त्रास झाल्याचे त्यांनी नमुद केले

Scroll to Top