राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे.
राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन 247 नगर परिषदा तसेच 147 नगर पंचायती यांच्या निवडणुका या डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यभरातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने निवडणुक आयोग सर्वोतोपरी तयारी करीत अाहे. निवडणुका संदर्भात राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन निवडणुक अधिकारी यांच्या तयारीचा आढावा पाहता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकुण 247 नगर परिषद व 147 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका नोंव्हेंबर अखेर घेण्याची तयारी होती.
ही बातमी वाचा – आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी
परंतु सदर निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील असे निवडणुक आयोगाकडून सुचविण्यात आले आहे. तर डिसेंबर च्या शेवटी 32जिल्हा परिषद व 336 पंचायत समितीच्या निवडणुका होतील तर शेवटच्या टप्प्यामध्ये 29 महानगर पालिकेचा निवडणुका झेण्यात येतील न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी अखेर सर्व निवडणुक प्रक्रीया पार पाडण्याच्या आदेशानुसार 20 जानेवारी पर्यंत त्रिस्तरीय निवडणुका पार पाडण्याचा राज्य निवडणुक आयोगाचा प्रयत्न आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
सदोष मतदार याद्या विरुध्द महाविकास आघाडी व मनसेचे टिकास्त्र.
राज्यातील मतदार यादीतील घोळ मिटल्यावरच निवडणुका घेण्याच ी मागणी जेष्ठ नेते शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी तर या मतदार याद्यातील घोळ सोडविण्यासाठी थोडा कालावधी लागला तरी चालेल तरी मतदार याद्यातील घोळ काढूनच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तर राजेश ठाकरे यंानी स्पष्टच सांगितले आहे की, निवडणुक आयोगाच्या प्रतिसादानुसार पुढील व्युह रचना जाहीर केली जाईल.
