राज्यातील आरोग्य विभागाचे कान, नाक, डोळे असणाऱ्या आरेाग्यसेविका आशा वर्कर यांची साथरोग, गरोदर महिला व तसेच सव्हेक्षणात महत्वपुर्ण योगदान असते परंतु यावेळी दिवाळी भेट देतांना पालिका प्रशासनाच्या वतीने आशा सेविकांना भाऊबीज भेट दिली नाह. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे तीन हजार आरोग्य सेविकांना यंदाच्या दिवाळीमध्ये 14 हजार रुपयांची भेट देण्यात येणार ही मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी देण्यात येणाऱ्या भेटीमध्ये दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती आरोग्यसेविका संघटनेकडून देण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये आरोग्यसेविकांना एक महिन्याच्या वेतनाऐवढी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्याची मागणी प्रकाश देवदास यांनी 2023 मध्ये केली होती ही मागणी तात्काळ मान्य केल्यामुळे यंदा दोन हजार रुपयांची वाढ मिळाली आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
मात्र दिवाळी बोनस यादीत आरोग्य सेवेच्या अग्रभागी काम करणाऱ्या आशा सेविकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे 2250 आशा सेविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मुंबई जिल्हा अशा व गटप्रवर्तक युनियन तर्फे या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बीएमसीच्या आयुक्तांनी विविध कर्मचारी, शिक्षक,सीएचव्ही बालवाडी शिक्षीका आणि मदतनीस यांना दिवाळी बोनस जाहीर केला असला तरी आशा वर्करांना यातुन वगळण्यात आले आहे.
ही बातमी वाचा – यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन!
समान काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये भाऊबीज देण्यात येत आहे, मग बीएमसीतील अथवा एनएचएमच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशांना या लाभापासून का वंचित ठेवल्या जात अाहे असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.
