महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली.
ही बातमी वाचा – नेत्यांना आवरा, अन्यथा निवडणुकीत हिशेब करु-मंत्री छगन भुजबळ
अगोदरपासूनच माजी आमदार शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांचे सोयरेसुतक जुळत नाही त्यातच या चारचाकीबाबत प्रतिक्रीया देतांना माजी आमदार तथभिाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी अामदार संजय गायकवाड यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. शिंदे म्हणाले की, कॉन्ट्रक्टरच्या नावावर दिड कोटीची डिफेंड व कमिशन मिळालं आहे ही चौकशी होणे अत्यावश्यक आहे.त्यावर त्यांनी स्पष्ट केले की बुलढाण्यात महायुती टिकण्यासाठी यावेळी भाजपचा नगराध्यक्ष पदाकरीता प्रबळ दावा आहेे तरी या मतानुसारच युती शक्य आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
या डिफेंडर च्या नावावरुन शिंदे हे आरोप करीत म्हणाले की, ती गाडी एका कॉट्रंक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामाच्या कमिशनमुळे मिळाली याची चौकशी होणे गरजेचे आहे. तरी येणाऱ्या काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभुमीवर या राजकीय संघर्षात बुलढाण्यात भाजपा व शिंदे गटात तणाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. तरी बुलढाण्यात आलेल्या लँड रोव्हर डिफेंडर ची चर्चा जरी असली तरी त्याचे राजकीय वादात रुपांतर झाले आहे. त्यामुळे यापुढे या वादावरुन बुलढाण्यात दिवाळीपेक्षा जोमात फटाके फुटणार अशा चर्चा रंगु लागल्या आहेत.
