दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची खरेदी हा नेहमीचा विषय असला तरी सद्या सोने महागण्याचा स्तर कायम राखत आहे तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
दिवाळीच्या सणामध्ये सोन्याला आलेली तेजी उतरण्याचे नाव घेत नाही. राज्यातील जळगाव येथील सराफा बाजरामध्ये सोन्याच्या दरात दिवाळीच्या पहील्याच दिवशी विक्रमी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार 600 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरामध्ये 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. स्थानिक पातळीवर असेलेले शुल्क आणि कर हे वेगवेगळे असल्याने सोने चांदीच्या दरात तफावत दिसून येत आहे.
ही बातमी वाचा – ऐन दिवाळीत महागला सुका मेवा
सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी दर जीएसटीसह 1 लाख 35 हजार 239 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचा प्रतिकीलो दर जीएसटीसह 1 लाख 80 हजार रुपये झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील जळगांव येथील सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने विनाजीएसटी 1 लाख 31 हजार 300 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
सोने– चांदीतील वाढती गुंतवणूक पाहता सोन्याचा तुडवड्याची शक्यता!
आता सोने- चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गंुतवणूक वाढत असल्याने चांदीसोबत सोन्याच्या तुडवडा जाणवत असल्याची माहिती जळगांव सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. अशा पध्दतीने सोन्याचे दर वाढत राहिल्यास दिवाळीत ऐन मुहुर्तावर सोन्याचा तुडवडा जाणवण्याची शक्यता सराफा बाजारातील व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
दाेन दिवसात चांदीच्या दरात पाच हजाराची घसरण
चांदीने यावर्षी इतिहास रचला असून एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजार झाला होता. गेल्या दोन दिवसात चांदीत पाच हजाराची घसरण झाल्याचे सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
