शेगांव- शेगांव शहरातील मटकरी गल्ली या अतिसुरक्षित असलेल्या नर्मदा अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या एका38 वर्षीय विवाहीतेच्या घरात चार युवकांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसुन अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सुशिक्षित नागरिकांना थरकाप सुटला
दि.13 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या दोन मुलीसह घरात असतांना अचानक घराच्या दरवाज्यावर ठोठावण्याचा आवाज आला फिर्यादीने दरवाजा उघडताच बाहेर उभे असणारे चार तरुण राहुल शर्मा, रा.भुतबंगला, गोपाल निबांळकर, रा.मोदी नगर,शेगांव, संकेत देशमुख रा. रोकडीया नगर,शेगांव हे दरवाज्यासमोर रागाच्या भरात उभे होते.त्यापैकी एकाने धमकावत विचारले की, तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून घेतलेले उसने पैसे केव्हा देणार? तुझा नवरा कुठे आहे? महिलेने त्यावर उत्तर देत सांगितले की, माझे पती कामानिमित्त अकोना येथे गेले आहेत आणि ती घरात दोन मुलीसोबत एकटी आहे.
ही बातमी वाचा – लाडकी बहीण योजनेचे 410 कोटी मंजुर;लाडक्या बहीणींना ऑक्टोबर च्या हप्त्याची प्रतिक्षा?
तरी सुध्दा ते दमदाटी घरात घुसुन सर्व बाजुंनी तिच्या नवऱ्याचा शोध घेण्यास सुरवात केली. घरात गोंधळ, धमकी आणि आरडाओरड सुरु झाली. पती घरात दिसून न आल्याने त्या चौघांची असभ्य भाषेत शिवीगाळ केली तर त्या चारपैकी एकाने ठणकावले की, तुझ्या नवऱ्याला सांग माझे पैसे लवकरात लवकर परत केले नाही तर मी त्याला जीवाने संपवीन घाबरलेल्या महिलेने आरडाओरड सुरु केली.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
त्यावेळी शेजारी सुध्दा जमा झाले. वाढता जमाव पाहता आरोपींनी तेथुन पळ काढला या अशायच्या घटनाक्रम बद्दल फिर्यादी ने शेगांव शहरा पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन त्या आरोपीविरुध्द अप नं. 547/2025 नुसार आरोपीवर 333,352, 351(2)(3), 3(5) भान्यासं नुसार कारवाई करण्यात आली.
